शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 21:26 IST

1 / 8
जगात असे अनेक देश आहेत, जिथे भारतीय चलनाचा दबदबा आहे आणि ते देशही खूप सुंदर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जिथे तुम्ही स्वस्तात पर्यटनासाठी जाऊ शकता.
2 / 8
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये विदेशी प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर इराण तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. भारतातून फक्त ₹१०,००० घेऊन जा आणि तिथल्या संस्कृतीचा, जेवणाचा आणि खरेदीचा पूर्ण आनंद घ्या.
3 / 8
इराणमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू खूप स्वस्त आहेत. रस्त्यावरील स्ट्रीट फूडपासून ते स्थानिक रेस्टॉरंट्सपर्यंत सगळंच खूप स्वस्त आहे. कारण तिथे भारतीय रुपयाची किंमत तब्बल ५ पट आहे.
4 / 8
कला आणि ऐतिहासिक वास्तूंची आवड असलेल्या लोकांसाठी इराण एक स्वर्गच आहे. येथील मशिदी, राजवाडे आणि बाजारपेठा तुम्हाला त्यांच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीत रममाण करून टाकतील.
5 / 8
खरेदीच्या बाबतीतही इराण खूप स्वस्त आहे. तुम्ही हाताने तयार केलेले गालिचे, पारंपारिक पोशाख आणि स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
6 / 8
इराणमधील स्थानिक वाहतूक व्यवस्था देखील बजेट-फ्रेंडली आहे. बस, मेट्रो आणि टॅक्सीच्या माध्यमातून तुम्ही शहरांदरम्यान सहज प्रवास करू शकता, ज्यामुळे तुमचा खर्च खूप कमी होतो.
7 / 8
जर तुम्हाला फोटोशूट आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंग आवडत असेल, तर इराणमधील गल्ल्या, मोहल्ले आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये खूप सुंदर लोकेशन्स आहेत. येथील प्रत्येक कोपरा इंस्टाग्रामसाठी परफेक्ट आहे.
8 / 8
हिवाळा आणि उन्हाळ्यात इराणचे हवामान पर्यटनासाठी चांगले असते. कमी खर्चात हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये राहून तुम्ही या लांबच्या प्रवासाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
टॅग्स :tourismपर्यटनIranइराण