शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel: स्वित्झर्लंड ट्रीपचं नियोजन करताय? 'हे' व्हिसा नियम वाचा, नाहीतर एअरपोर्टवरूनच परतावे लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 20:21 IST

1 / 7
बॉलिवूड चित्रपटांमधील ते बर्फाच्छादित डोंगर आणि स्विस आल्प्सच्या सुंदर दऱ्या प्रत्यक्षात पाहण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही या वर्षात स्वित्झर्लंडला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर बॅग भरण्यापूर्वी तिथल्या व्हिसा नियमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वित्झर्लंड हा 'शेंगेन' देशांच्या समूहात येत असल्यामुळे तिथले व्हिसा नियम तुमच्या प्रवासाचा उद्देश आणि कालावधीवर अवलंबून असतात.
2 / 7
स्वित्झर्लंड प्रामुख्याने दोन प्रकारचे व्हिसा जारी करते: १. शॉर्ट टर्म व्हिसा : हा व्हिसा ९० दिवसांपर्यंतच्या प्रवासासाठी असतो. प्रामुख्याने पर्यटक, व्यावसायिक काम किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी याचा वापर केला जातो. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
3 / 7
२. लॉन्ग टर्म व्हिसा : जर तुम्हाला ९० दिवसांपेक्षा जास्त काळ तिथे राहायचे असेल, तर हा व्हिसा आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला थेट स्विस दूतावासात जाऊन अर्ज करावा लागतो.
4 / 7
भारतीय पासपोर्ट धारकांसाठी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी व्हिसा घेणे अनिवार्य आहे. तुमचा प्रवास कितीही दिवसांचा असला तरी व्हिसा लागणारच. मात्र, ज्यांच्याकडे अधिकृत 'डिप्लोमॅटिक पासपोर्ट' आहे, त्यांना काही अटींवर व्हिसातून सूट मिळू शकते. तसेच, जर तुमच्याकडे आधीच एखाद्या शेंगेन देशाचा वैध 'रेसिडेंस परमिट' किंवा 'टाइप-D' व्हिसा असेल, तर तुम्हाला स्वित्झर्लंडसाठी वेगळ्या व्हिसाची गरज भासणार नाही.
5 / 7
तुमचा व्हिसा मंजूर होण्यासाठी पासपोर्टच्या काही अटी पाळणे बंधनकारक आहे. तुमचा पासपोर्ट गेल्या १० वर्षांच्या आत जारी झालेला असावा. तुम्ही शेंगेन क्षेत्र सोडल्यानंतरही तुमचा पासपोर्ट किमान ३ महिने वैध असणे आवश्यक आहे. प्रवासाच्या तारखेच्या जास्तीत जास्त ६ महिने आधी तुम्ही व्हिसासाठी अर्ज करू शकता.
6 / 7
तुम्ही राहता त्या ठिकाणच्या स्विस दूतावासात किंवा अधिकृत व्हिसा सर्व्हिस प्रोव्हायडरमार्फत (उदा. VFS Global) अर्ज करू शकता. अनेकदा व्हिसासाठी अपॉइंटमेंट घेणे गरजेचे असते. ही अपॉइंटमेंट मोफत असते, परंतु गर्दीच्या हंगामात ती मिळायला वेळ लागू शकतो, त्यामुळे किमान महिनाभर आधी तयारी सुरू करणे फायद्याचे ठरते.
7 / 7
स्वित्झर्लंडमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार किंवा कमाई करण्याचा विचार असेल, तर त्यासाठी व्हिसाचे नियम अधिक कडक आहेत, याची नोंद पर्यटकांनी घ्यावी.
टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडtourismपर्यटन