By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:55 IST
1 / 6गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते गर्दीने फुललेले समुद्र किनारे, धिंगाणा आणि नाईटलाईफ! पण मित्रांनो, गोव्याचं खरं सौंदर्य हे या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत दडलं आहे. जर तुम्हाला यंदाची गोव्याची सहल थोडी हटके आणि निवांत करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी ५ अशा ऑफबीट जागा शोधून काढल्या आहेत, जिथे तुम्हाला गोव्याची अस्सल संस्कृती आणि निसर्गाची जादू अनुभवायला मिळेल.2 / 6काकोलेम बीच: याला 'टायगर बीच' म्हणूनही ओळखले जाते. गोव्यातील सर्वात कमी गर्दी असलेल्या बीचेसपैकी हा एक आहे. इथे पोहोचणे थोडे कठीण असले तरी, इथला निळाशार समुद्र, सभोवतालचे डोंगर आणि हिरवळ पाहून तुम्ही स्वतःला विसरून जाल. ज्यांना एकांत हवा आहे, त्यांच्यासाठी हा बीच म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच आहे.3 / 6अरवलेम धबधबा: उत्तर गोव्यातील साखळीजवळ असलेला हा धबधबा 'हरवलेम' नावानेही ओळखला जातो. सुमारे ५० ते ७० मीटर उंचीवरून कोसळणारा हा पांढराशुभ्र धबधबा पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणे आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथलं सौंदर्य अधिकच खुलतं. गर्दीपासून दूर असलेल्या या जागेवर तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.4 / 6दिवर आयलंड: मांडवी नदीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं बेट तुम्हाला थेट जुन्या काळात घेऊन जाईल. पणजीजवळ असलेल्या या बेटावर अजूनही पोर्तुगीज शैलीतील जुन्या वास्तू आणि शांत रस्ते पाहायला मिळतात. इथलं स्थानिक जीवन आणि साधेपणा तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. गोव्याची ट्रेडिशनल झलक पाहायची असेल तर दिवर आयलंडला नक्की जा.5 / 6नेत्रावली वन्यजीव अभयारण्य: जर तुम्हाला जंगलाची ओढ असेल, तर दक्षिण-पूर्व गोव्यातील सांगुएम तालुक्यातील नेत्रावली अभयारण्य तुमच्यासाठीच आहे. २११ चौरस किमीमध्ये पसरलेल्या या घनदाट जंगलात तुम्हाला निसर्गाचा खरा थरार अनुभवायला मिळेल. ट्रेकिंग, दुर्मिळ वन्यजीव आणि मनमोहक धबधबे हे इथले मुख्य आकर्षण आहे. शहराच्या गडबडीपासून दूर काही काळ शांततेत घालवण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे.6 / 6बटरफ्लाय बीच: दक्षिण गोव्यातील पालोलेम आणि अगोंडा दरम्यान वसलेला हा 'क्रेसेंट' आकाराचा बीच म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडी ट्रेकिंग करावी लागते किंवा बोटीचा आधार घ्यावा लागतो. पण एकदा का तुम्ही इथे पोहोचलात की तिथली शांतता आणि समुद्राचं निळं पाणी तुमची सगळी मेहनत सार्थ करेल. नशिबाने साथ दिली तर तुम्हाला इथे डॉल्फिनचे दर्शनही घडू शकते!