गार्डनमधील 'हा' स्पर्श ठरू शकतो जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:11 PM2019-09-23T15:11:26+5:302019-09-23T15:14:22+5:30

बऱ्याचदा एखाद्या नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टींपासून आपण लांब राहण्याचा निर्णय घेतो. परंतु झाडं- फुलं ही बऱ्याच जणांच्या आवडीचे असतात

त्यांच्या सौंदर्यामुळेच प्रत्येकालाच त्यांना हात लावण्याची इच्छा होते. परंतु अशीही काही झाडं आहेत ती फारच विषारी असतात.

या झाडांना स्पर्श केल्यानंतर क्षणभरात आपला मृत्यू ओढावू शकतो.

इंग्लंडच्या नॉथमबेरलँडमध्ये उपस्थित ‘Alnwick Poison Garden’मध्ये विषारी जनावरंही आहेत.

नॉथमबेरलँडची राणीनं या गार्डनला 1750मध्ये तयार केलं होतं. या विषारी झाडांचा वापर एखाद्याचा जीव घेण्यासाठीही होऊ शकतो.

लोकांमध्ये विषासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशानं राणीनं हे गार्डन बनवलं होतं.