लाँग विकेंडला जाण्याचा प्लॅन करताय?; मग 'हे' ऑप्शन्स फक्त तुमच्यासाठीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:56 PM2019-08-22T12:56:26+5:302019-08-22T13:03:58+5:30

विकेंडला फिरण्यासाठी अनेक लोक वेगवेगळी ठिकाणं शोधत असतात. विकेंडची मस्त ट्रिप कामाच्या ताणापासून दूर नेऊन रिफ्रेश करण्यासाठी मदत करते. अशातच तुम्हीही याच शोधात असाल तर आज आम्ही देशातील काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. जिथे तुम्ही फिरण्यासोबतच निसर्गाचा आनंद घेऊ शकता. जाणून घेऊया देशातील काही खास ठिकाणांबाबत...

दलाई लामा यांचं निवासस्थान म्हणून धर्मशाळा ओळखलं जातं. जर तुम्ही शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर येथे जाऊन तुम्ही रिफ्रेश होऊ शकता. भारतातील पहिली तिबेटी नगर म्हणून धर्मशाळा ओळखलं जातं. येथे तुम्हाला भारतीय आणि तिबेची संस्कृतीचं मिश्रण पाहायला मिळेल. त्याचबरोबर येथील प्राकृतिक सौंदर्यही आकर्षित करेल.

गोवा म्हणजे, कधीही गेलं तरी नुसती धम्माल. जर तुम्हाला तुमचा विकेंड समुद्राच्या किनाऱ्यावर एन्जॉय करायचा असेल तर गोवा एकदम भारी डेस्टिनेशन ठरतं. येथे तुम्ही नाइटलाइफ, संस्कृतिक आणि अॅडव्हेंचर्सचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील काही भागांमध्ये तुम्हाला विदेशी संस्कृती अनुभवता येईल.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान यूनेस्कोचं नामांकन मिळालेल्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला वेगवेगळे पशु-पक्षी पाहायला मिळतील.

कोलकत्त्यापासून 184 किलोमीटर दूर असलेला दीघा बीच म्हणजे, निसर्गाचं अद्भूत सौंदर्य. येथे जाऊन मावळणारा सूर्य पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. येथे तुम्हाला अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.

जर तुम्हाला तुमची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात, दरी-खोऱ्यांमध्ये एन्जॉय करायची असेल तर कलीमपोंगला जाऊ शकता. येथे प्रसिद्ध डरपिन मठ आहे.