'जगाच्या सफरीवर जायचंय...तर हे आहेत सर्वात स्वस्त देश'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:56 IST2017-09-13T18:44:59+5:302017-09-13T18:56:23+5:30

पेरू येथे तुम्हाला साधारण 500 रूपयांमध्ये एक रूम बूक करता येईल तर 350 ते 400 रूपयांमध्ये जेवणाची सोय होईल.
कंबोडिया येथेही राहण्याचा अथवा खाण्याचा जास्त खर्च येत नाही. 250 रूपयांमध्ये येथे तुमचं जेवण होऊ शकतं.
बल्गेरिया येथे रूम बूक करण्यासाठी तुम्हाला 600 रूपये खर्च येईल.
चीनमध्ये फिरतानाही तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. येथे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यास केवळ 60 ते 70 रूपये खर्च येतो.
इंडोनेशियात तुम्ही 250 रूपयात हॉटेलमध्ये रूम बूक करू शकतात, तर 70 रूपयांमध्ये तुमचं येथे जेवण होईल.
नेपाळमध्ये तुम्हाला 250 रूपयांपर्यंत रूम मिळू शकते. तर येथे देखील केवळ 200 रूपयांमध्ये तुम्हाला येथे जेवण मिळू शकतं.
थायलंडमध्ये तुम्हाला 250 रूपयांपर्यंत रूम मिळू शकते. तर केवळ 200 रूपयांमध्ये तुम्हाला येथे जेवण मिळू शकतं.