फक्त दल सरोवर, ट्युलिप आणि शिकाराच नाही तर श्रीनगरमधील 'ही' ठिकाणं आहेत सर्वात सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:26 PM2024-03-07T16:26:40+5:302024-03-07T16:58:32+5:30

Tourist Places in Srinagar : लेक, लाकडी बोटी आणि फ्लोटिंग मार्केटमुळे येथे व्हेनिसची अनुभूती येते, म्हणूनच श्रीनगरला व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हटले जाते.

दल सरोवर, ट्युलिप आणि शिकारा अशी नावे सांगताच श्रीनगरचे चित्र डोळ्यासमोर येते, पण श्रीनगरची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नाही. लेक, लाकडी बोटी आणि फ्लोटिंग मार्केटमुळे येथे व्हेनिसची अनुभूती येते, म्हणूनच श्रीनगरला व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हटले जाते. गेल्या दशकात येथे विशेषतः लग्नाच्या फोटोशूटसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे.

श्रीनगर लाकडाच्या बोटीच्या उद्योगासाठीही ओळखले जाते. देश-विदेशातील पर्यटक येथे पोहोचतात. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यात बरेच बदल झाले. संपूर्ण राज्यात पर्यटकांची संख्या वाढल्यानेही मोठा बदल दिसून आला. त्यामुळे राज्याची राजधानी श्रीनगरशी संबंधित अशा काही खास गोष्टी जाणून घ्या, ज्या कमी लोकांना माहीत आहेत.

ट्युलिप गार्डन : श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन जगभरात प्रसिद्ध आहे. श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन हे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे. जिथे खूप वैविध्य आहे.

बर्फाच्छादित पर्वतांवर स्कीइंग-ट्रेकिंग: श्रीनगरमधील बर्फाच्छादित पर्वतांवर स्कीइंग आणि ट्रेकिंगसारखे साहसी उपक्रम करणे देखील एक वेगळा अनुभव देते.

काश्मिरी फूड: काश्मिरी कबाबपासून ते कहवापर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. तुम्हाला काश्मिरी चव आवडत असेल तर तुम्ही श्रीनगरला जाऊ शकता.

काश्मिरी एम्ब्रॉयडरी: जर तुम्हाला काश्मीर एम्ब्रॉयडरी आवडत असेल तर श्रीनगर त्यासाठी उत्तम डेस्टिनेशन ठरेल. जगभरातून पर्यटक इथे येतात. याठिकाणी कपडे विकत घेऊन, इथं फोटो काढायला विसरू नका.

काश्मिरी हस्तकला: श्रीनगर हे काश्मिरी हस्तकलेसाठीही ओळखले जाते. पश्मीर शाल, हाताने विणलेले कार्पेट आणि लाकडी हस्तकला येथे उपलब्ध आहेत.

मुघल गार्डन: श्रीनगर मुघल गार्डनसाठी ओळखले जाते. याशिवाय, इथे आल्यास शालिमार बाग, निशात बाग, चष्मेशाही यासारख्या गार्डनचा आनंद लुटता येतो.

हजरतबल दर्गा: हा श्रीनगरमधील प्रसिद्ध दर्गा आहे. हा दर्गा काश्मिरी स्थापत्य आणि मुघल स्थापत्यकलेचे सौंदर्यही दाखवतो. पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या या दर्ग्याजवळ अनेक बागा आहेत.

शंकराचार्य मंदिर : येथील शंकराचार्य मंदिर देखील सौंदर्यापेक्षा कमी नाही. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या प्राचीन मंदिरातूनही श्रीनगरचे सौंदर्य पाहता येते.

समृद्ध शहर: श्रीनगर शहर म्हणजे समृद्ध शहर. हे नाव संस्कृतमधून आले आहे. म्हणजे समृद्धीने भरलेले शहर.

व्हेनिस ऑफ द ईस्ट : सरोवरांवर तरंगणारे शिकारा आणि फ्लोटिंग मार्केट, यामुळे श्रीनगरला व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हटले जाते.