उन्हाळ्यात विदेशात फिरायचा प्लॅन करताय? मग 'ही' बजेट फ्रेंडली ठिकाणे पाहू शकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 19:02 IST2023-04-30T18:45:41+5:302023-04-30T19:02:09+5:30
Summer Trip : ही इंटरनॅशनल ट्युरिस्ट प्लेसल बजेट फ्रेंडली आहेत. या ठिकाणी तुम्ही स्वस्तात भरपूर आनंद घेऊ शकाल.

काही लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इंटरनॅशनल ट्रिपचे नियोजन देखील करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला काही इंटरनॅशनल ट्युरिस्ट प्लेसची माहिती दिली जात आहे. ही इंटरनॅशनल ट्युरिस्ट प्लेसल बजेट फ्रेंडली आहेत. या ठिकाणी तुम्ही स्वस्तात भरपूर आनंद घेऊ शकाल.
व्हिएतनाम
व्हिएतनाम - हे एक अतिशय परवडणारे ठिकाण आहे. येथे तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला इथली सुंदर दृश्ये आणि अनोखी संस्कृती आवडेल. हनोई आणि हो ची मिन्ह सारख्या शहरांमध्ये पर्यटनासाठी जाऊ शकता.
मेक्सिको
मेक्सिको - उन्हाळ्यात फिरण्यासाठी मेक्सिको हे उत्तम ठिकाण आहे. येथे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारा आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येईल. तुम्ही बजेट फ्रेंडली हॉटेलमध्ये राहू शकता.
कोस्टा रिका
कोस्टा रिका - तुम्ही कोस्टा रिकाला जाऊ शकता. तुम्ही येथे सर्फिंग आणि झिप-लाइनिंगसारख्या अनेक अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला आवडेल. तसेच, तुम्ही काही समुद्रकिनाऱ्यांवर आराम देखील करू शकता.
पोर्तुगाल
पोर्तुगाल - तुम्हाला पोर्तुगालची आकर्षक शहरे आणि स्वादिष्ट पाककृती आवडतील. तुम्ही लिस्बन, पोर्टो, मडेरा, सिंत्रा, अझोरेस आणि एव्होरा सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. येथील ट्रिप तुमच्या नेहमी लक्षात राहील.