Sleep Tourism : फक्त फिरण्यासाठीच नव्हे तर चांगल्या झोपेसाठीही प्रसिद्ध आहेत 'ही' ठिकाणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:17 IST2022-12-05T13:11:44+5:302022-12-05T13:17:49+5:30
Sleep Tourism : भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी भटकंती व्यतिरिक्त चांगल्या झोपेसाठी देखील ओळखली जातात.

सध्याचे व्यस्त जीवन आणि स्ट्रेसचा नकारात्मक परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर झोपण्याच्या सवयींवरही होतो. तसे, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी भटकंती व्यतिरिक्त चांगल्या झोपेसाठी देखील ओळखली जातात. या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया...
अलेप्पी, केरळ: निसर्गसौंदर्य असलेल्या केरळमध्ये फिरायला जाणे, म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या राज्याने स्वतःमध्ये एक अनोखे विश्व निर्माण केले आहे. तुम्ही येथे जाऊन बॅकवॉटरमधील शांत वातावरणात चांगली झोप घेऊ शकता. राज्यात अनेक ठिकाणी हाऊसबोट किंवा बॅकवॉटरची सुविधा उपलब्ध होणार असली, तरी अलेप्पी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
लेह : भारतातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक असलेल्या लेहमध्ये अनेक ठिकाणे आहेत, जी नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. लेहची हवा आणि पाणी इतर ठिकाणांपेक्षा स्वच्छ आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी चांगल्या ठिकाणी राहून चांगली झोप घेता येईल आणि अनेक दिवसांचा थकवा दूर करता येईल.
पँगोगात्सो, लडाख: लडाख हा देखील भारताचाच असा भाग आहे, ज्याच्या नैसर्गिक सौंदर्याला देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक भेट देतात. तसे, तलावाच्या काठावर वसलेल्या या ठिकाणी झोप पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा आहे.
तोश, हिमाचल : हिमाचलच्या पार्वती खोऱ्यात वसलेल्या तोशला भेट देऊन तुम्ही आराम करू शकता. या ठिकाणच्या थंड वातावरणात आणि हवेत एक वेगळाच आराम मिळतो. तोशच्या सहलीद्वारे तुम्ही पार्वती व्हॅली जवळून पाहू शकाल.