अंडरवॉटर फोटोग्राफीचा नजारा, एकदा बघाल बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:22 PM2020-03-06T16:22:04+5:302020-03-06T16:58:53+5:30

पाण्याच्या आत होत असलेल्या हालचाली काही लोक खूप आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने टिपत असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही वेगवेगळ्या देशात टिपलेले फोटोस दाखवणार आहोत. ५५ वर्षांपासून ब्रिटीश सोसायटी ऑफ अंडर वॉटर फटॉग्राफीसाठी अवॉर्ड घोषित करतात. त्याचप्रमाणे २०२० चे सुद्धा अंडरवॉटर फोटोग्राफर घोषित करण्यात आले आहेत. या फोटोग्राफी स्पर्धेसाठी पन्नास हजारांपेक्षा जास्त फोटोजची निवड करण्यात आली होती.

अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर आणि वाइड एंगल कॅटेगरीचे विजेता हा फोटो होता.

समुद्र संरक्षण या विभागात विजेता असलेल्या या फोटोग्राफरची ही कला आहे. मासा जाळ्यात फसल्यानंतर हा फोटो काढला आहे.

केरळच्या बीचवर काढलेला हा फोटो आहे. मॅक्रो विभागात काढलेला जर्मन फोटोग्राफरचा हा फोटो आहे.

फोटोग्राफर किगो कावामुरा ने हा फोटो जापानच्या इजू ओशनिक पार्क मध्ये काढला आहे. समुद्रात दोन ते तीन मिटरच्या अंतरावर हा फोटो काढला आहे.

या फोटोत ऑक्टोपसने फुटबॉल पकडला आहे. हे फोटो फोटोग्राफर पास्कल वासल्लो यांनी काढले आहेत.

सिंगापुरचा फोटोग्राफर लिलियन कोह यांनी फिलिपिंसमध्ये हा फोटो काढला आहे. या फोटोत जुवेनाइल वंडरपस ऑक्टोपस दिसत आहे.

हा फोटो इंडोनेशियाच्या कोमोडो नॅशनल पार्कमध्ये सिंगापुरचे फोटोग्राफर मोक वाई हो यांनी काढला आहे. या फोटोला ब्लॅक एंड व्हाईट या कॅटेगरीत जिंकण्याचा मान मिळाला आहे.

फोटोग्राफर ट्रेवॉर रीसला ब्रिटनच्या लॉक ड्वीक समुद्रात मिळालेला हा फोटो आहे.

ब्लॅक एंड व्हाईट कॅटेगरीत उपविजेत्याचा मान असलेला हा फोटो आहे.