भारतातलं एकमेव शाकाहारी शहर, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 02:42 PM2019-10-20T14:42:53+5:302019-10-20T14:49:07+5:30

जर जगातल्या विचित्र शहरांची यादी तयार केल्यास भारतातलं एक शहर त्यात आवर्जून सापडेल.

जुळ्या मुलांच्या गावापासून सर्वात जास्त मंदिर असलेलं शहर, अशी याची ओळख आहे.

गुजरातमधल्या पलिताना शहरात सर्वाधिक जैन मंदिरं आहेत. विशेष म्हणजे हे शहर पूर्णतः शाकाहारी आहे.

गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यात पलिताना हे शहर वसलेलं आहे. याला सर्वात शुद्ध शहर समजलं जातं.

जैन समुदायाचं हे तीर्थ स्थान आहे. या शहरात तुम्ही अंडी किंवा मांस विकताना आढळल्यास तुमची खैर नाही.

मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरून हे शहर 200 किलोमीटर दूर आहे. पर्यटकांना हे शहर नेहमीच आकर्षित करतं. या शहरात पर्यटकांना अंडी आणि मांस आणण्यास सक्त मनाई आहे.