एक नंबर ना राव! देशातलंच नव्हे, आशियातलं सर्वात स्वच्छ गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:32 PM2019-10-10T16:32:15+5:302019-10-10T16:36:50+5:30

मेघालयातलं मावल्यान्नाँग देशातलंच नव्हे, तर आशियातलं सर्वात स्वच्छ गाव आहे.

आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मावल्यान्नाँगला पुरस्कार मिळाला आहे.

विशेष म्हणजे मावल्यान्नाँग गावची साक्षरता १०० टक्के आहे. या गावातली अनेक मंडळी अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात.

या गावात अनेक सुंदर झरे आहेत. झाडांच्या मुळापासून तयार झालेला पूल हे मावल्यान्नाँगचं वैशिष्ट्य.

मावल्यान्नाँगचे ग्रामस्थ कचऱ्यापासून खत तयार करुन त्याचा सदुपयोग करतात.

जवळ कचराकुंडी नव्हती म्हणून रस्त्यावर कचरा टाकला, असं कारण कोणीही सांगू नये यासाठी गावातल्या रस्त्यांवर ठराविक अंतरावर कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत.

२००३ मध्ये मावल्यान्नाँगला आशियातल्या सर्वात सुंदर गावाचा पुरस्कार मिळाला.

२००५ मध्ये देशातलं सर्वात गाव म्हणून सरकारनं मावल्यान्नाँगला पुरस्कारनं गौरवलं.