शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्नाटकातील 'या' ठिकाणांवर घालवलेला वेळ आयुष्यभर लक्षात राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:28 PM

1 / 9
जर तुम्हाला नवीन वर्षात पर्यटनाचा अनुभन घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला कर्नाटकच्या काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला फिरण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.
2 / 9
कूर्ग हे कर्नाटकातील सुंदर आणि आकर्षक थंड हवेचे ठिकाण आहे. तसंच या निसर्गरम्य ठिकाणी खूप शांतता जाणवेल. जर तुम्ही रोजच्या आयुष्यातून वेळ काढून निवांत होऊ इच्छित असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
3 / 9
नल्कनड पैलेस, बारापोल नदी, ब्रह्मगिरी शिखर, इरुप्पु जलप्रपात, नामद्रोलिंग मठ, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, चेलवारा चे माइक्रोलाइट उड़ान, कावेरी नदी हे या ठिकाणचे प्रमुख केंद्रबिंदू असलेलं पर्यटन स्थळ आहेत.
4 / 9
कर्नाटकातील शिमोगा हे कर्नाटकचे रत्न म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या शांततेत आणि पर्वतांमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला आनंदायी अनुभव मिळेल.
5 / 9
इथल्या वातावरणात अनेक पशूपक्षी आढळून येतात. या ठिकाणच्या अभयारण्यात वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात.
6 / 9
आकर्षक झरे तसंच सनसेट पॉईंट, श्री वेणुगोपाल कृष्ण स्वामी मंदिर हे कर्नाटकचे प्रमुख आकर्षण आहे.
7 / 9
गोकर्ण हे कर्नाटकमधले नदिच्या काठावर वसलेले शहर आहे. या ठिकाणाला कमी गर्दीचे गोवा असं सुध्दा म्हटलं जातं
8 / 9
ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, याना, हाफ मून बीच, कोटी तीर्थ, पैराडाइज बीच हे बीच पाहण्यासारखे आहेत.
9 / 9
अनेक ऐतिहासीक वास्तु या ठिकाणी पाहण्यासारख्या आहेत.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स