जगातलं सर्वात मोठं प्राणिसंग्रहालय, आतलं दृश्य पाहून थरकाप उडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 22:25 IST2019-12-03T22:21:47+5:302019-12-03T22:25:36+5:30

जगात एक असं प्राणिसंग्रहालय आहे, ते पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. चीनमधलं हे प्राणिसंग्रहालय प्रसिद्ध आहे.

इथे वाघ उघडपणे फिरतात. या प्राणिसंग्रहालयातून पर्यटकांनाच एका पिंजऱ्यातून नेण्यात येतं.

. या प्राणिसंग्रहालयात प्राणी मुक्तपणे विहार करतात, तर पर्यटकांना पिंजऱ्यात बंद करून न्यावं लागतं.

चीनच्या चौंगक्विंग शहरात हे प्राणिसंग्रहालय स्थित आहे. पर्यटक इथे वाघांना स्वतःच्या हातातूनच खाणं दिलं जातं.

पिंजऱ्यातूनच पर्यटक वाघांना ही मेजवाणी खाऊ घालतात. लेहे लेदु वाइल्डलाइफ जू नावाचं हे प्राणिसंग्रहालय वाघांसाठी प्रसिद्ध आहे.