शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 6:01 PM

1 / 9
भारतामध्ये अनेक सुंदर ठिकाणं आहेत. जी आपलं सौंदर्य आणि विविधतेसाठी ओळखली जातात. आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात लांब आणि आपल्या वेगळेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रीजबाबत सांगणार आहोत. जे आपल्या आर्कीटेक्चरसाठी विदेशांमध्येही प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया आपल्या वेगळेपणासाठी विदेशी पर्यटकांमध्येही आकर्षणाचा विषय असणाऱ्या काही ब्रीजबाबत...
2 / 9
मुंबईतील वरळी-वांद्रे सी-लिंक भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज आहे. या ब्रीजवरून सनसेटचं दृश्य अगदी सुंदर दिसतं. रात्रीच्या वेळी जगमगणाऱ्या लाईट्समध्ये हा ब्रीज एखाद्या रोमॅन्टीक डेस्टिनेशनप्रमाणे दिसतो.
3 / 9
हिंदी महासागरात तयार करण्यात आलेला रामेश्वरम येथील पांबम ब्रीज भारतातील सर्वात सुंदर ब्रीजपैकी एक आहे. 1914मध्ये बांधण्यात आलेला हा ब्रीज भारतातील सर्वात पहिला समुद्री पूल आहे.
4 / 9
कोच्ची येथील वेम्बनाद ब्रीज भारतातील सर्वात लांब (4.6 कि.मी) रेल्वे ब्रीज आहे.
5 / 9
मंदिरांसोबतच ऋषिकेश राम झुला आणि लक्ष्मण झुलासाठीही प्रसिद्ध आहे. गंगा नदीवर तयार करण्यात आलेला हा ब्रीज अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे.
6 / 9
चेरापूंजी येथील लिविंग रूट ब्रीज नॉर्थ इस्ट भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. झाडांच्या खोडांपासून तयार करण्यात आलेल्या या ब्रीजवरून जाणं एखाद्या अॅडव्हेंचरप्रमाणे असतं.
7 / 9
सोनितपूरमध्ये असलेल्या या ब्रीजचे नाव अहोम जनरल कोलिया भोमोरा फुक्कनच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर तयार करण्यात आलेला हा ब्रीज भारतासह विदेशातही प्रसिद्ध आहे.
8 / 9
राजामंड्री येथील गोदावरी ब्रीज हा इतिहासातील सर्वात लांब रोज ब्रीज आहे. गोदावरी नदीवर तयार करण्यात आलेला हा ब्रीज 4.2 किमी लांब आहे.
9 / 9
कोलतत्ता येथे असलेला बंगालच्या खाडीमध्ये बांधण्यात आलेला हावरा ब्रीज कोलकत्तामधील सर्वात जुन्या ब्रीजपैकी एक आहे. या ब्रीजवर दररोज 100000 पेक्षा अधिक वाहनं आणि 150000 पेक्षा जास्त लोक पायी चालत प्रवास करतात.
टॅग्स :tourismपर्यटन