भारतातील 'या' पाच ठिकाणी भारतीयांनाच जाण्यास आहे मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:36 IST2018-05-10T15:35:34+5:302018-05-10T15:36:10+5:30

चेन्नईतील एका हॉटेलमध्ये फक्त विदेशी पासपोर्ट असणाऱ्या पर्यटकांनाच जाण्याची परवानगी आहे.

गोव्यात असेही काही बिच आहेत तेथे फक्त परदेशी नागरिक जाऊ शकतात. भारतीयांना तेथे जाण्यास मनाई आहे.

बंगळुरूतील या हॉटेलमध्ये विशेषकरून जपानी लोक जायचे. पण नंतर वाद सुरू झाल्यावर ग्रेटर बंगळुरू सिटी कॉर्पोरेशनने हे हॉटेल बंद केलं.

गोव्याप्रमाणे पुद्दूचेरीमध्ये असे काही बीच आहेत जेथे भारतीयांना जाता येत नाही. विदेश पासपोर्ट दाखवून तेथे बीचवर प्रवेश मिळतो.

हिमाचल प्रदेशमधील कसोलमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता. यावरून 2015मध्ये तेथे वाद झाला होता. हॉटेलच्या बाहेर भारतीयांना प्रवेश नसल्याचे बॅनर्सही लावण्यात आले होते.