गिटारसारखं दिसणारं जगातलं पहिलं हॉटेल; एका रात्रीचं भाडं ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 04:11 PM2019-10-29T16:11:49+5:302019-10-29T16:14:17+5:30

जगभरात अनेक चित्रविचित्र हॉटेल्स आहेत, पण ते पर्यटकांमध्येही तेवढेच प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्येही असंच एक हॉटेल तयार करण्यात आलं आहे.

या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी जवळपास 70 हजार रुपये मोजावे लागतात.

या हॉटेलमध्ये सोयीसुविधांनी युक्त असे 638 रूम आहेत. हॉटेल बनवण्यासाठी 10.62 हजार कोटींचा खर्च आलेला आहे.

450 फूट उंच असलेल्या या हॉटेलमध्ये एक मोठा हॉलही तयार करण्यात आला आहे. ज्यात एकाच वेळी 6500 लोक बसून कार्यक्रम करू शकतात.

हॉटेलमध्ये 19 रेस्टॉरंट आहेत. तसेच परिसरात 13 एकरवर लॅगून पूल आहे, तर 32 हजार वर्ग फूटमध्ये स्पा आणि सलून पसरलेलं आहे.