'या' देशांचा व्हिसा मिळवणं भारतीयांसाठी पिझ्झा मागवण्याइतकं सोपं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 22:16 IST2018-06-07T22:16:07+5:302018-06-07T22:16:07+5:30

जॉर्डन: भारतीय प्रवासी दाखल होताच इथं व्हिसा मिळतो. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी व्हिसा दिला जातो.
केनिया: या देशातही भारतीय व्यक्ती दाखल होताच लगेच व्हिसा दिला जातो. त्याचा कालावधी तीन आठवड्यांचा असतो.
लाओस: भारतीय नागरिक दाखल देताच लाओसमध्ये त्याला व्हिसा मिळतो. या देशाच्या व्हिसासाठी भारतीयांना आधीपासून अर्ज करावा लागत नाही. 30 दिवसांसाठी हा व्हिसा दिला जातो.
मालदिव: या देशात आगमन होताच भारतीय व्यक्तीला व्हिसा दिला जातो. त्याची मुदत ही 30 दिवसांची असते.
सेंट लुसिया: या देशातही भारतीयांना लगेच व्हिसा मिळतो. त्याचा कालावधी सहा आठवडे असतो.
थायलंड: भारतीय नागरिक दाखल होताच या देशाचा व्हिसा मिळतो. त्याची मुदत 15 दिवस असते.