मोदींच्या गुजरातमधला ऐतिहासिक ठेवा; फोटो पाहून तुम्हाला वाटेल हेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 15:44 IST2019-03-19T15:39:13+5:302019-03-19T15:44:16+5:30

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात चंपानेर पावागढ नावाचं शहर आहे. या शहरातील उद्यानाचा समावेश 2004 मध्ये जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.
आठव्या शतकात या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. इथल्या भिंतींची उंची 10 मीटर इतकी आहे.
या शहरातील इमारतींची रचना अतिशय विलोभनीय आहे. 3280 एकर परिसरात हे शहर वसलेलं आहे.
चंपानेर पावागढ शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरं, मशिदी आहेत. या शहरातील कालिकादेवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. 2600 फूट उंचीवर हे मंदिर वसलं आहे.
या शहरातील वास्तू अतिशय देखण्या आहेत. वास्तूकलेचा उत्तम नमुना या शहरात पाहायला मिळतो.
कधीकाळी या भागाची लोकसंख्या फक्त 500 होती.
चंपानेर पावागढ बडोद्यापासून 50 किमी अंतरावर आहे.