स्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:39 IST2019-01-17T16:35:08+5:302019-01-17T16:39:35+5:30

जगभरातल्या वेगवेगळ्या बीचेसचं वेगळेपण तुम्ही ऐकलं असेल. पण कधी अशी बीचबद्दल ऐकलं का जिथे वाळू नाही तर पॉपकॉर्न असतात? तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बीचवर पॉपकॉर्न कसे?
खरंतर हा नजारा आहे स्पेनच्या कॅनरी आयलॅंडच्या बीचचा. इथे वाळू ऐवजी जिकडे तिकडे पांढऱ्या रंगाचे पॉपकॉर्न बघायला मिळतात.
पण मजेदार बाब म्हणजे तुम्ही हे पॉपकॉर्न खाऊ शकत नाही. कारण हे पॉपकॉर्न नाही तर पॉपकॉर्नसारखे दिसणारे दगड आहेत.
या बीचची खासियत म्हणजे या चमकदार पॉपकॉर्नसारख्या दिसणाऱ्या दगडांमुळे हा बीच दिवस-रात्र चमकत असतो.
सध्या येथील फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.