शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंडीगडमधील 'ही' आहेत 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; तुम्ही पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 11:02 AM

1 / 6
चंडीगडमध्ये पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. हे शहर तुम्हाला पंजाब आणि उत्तर भारतातील लोकांच्या कला, संस्कृती आणि जीवनशैलीची ओळख करून देते. दरवर्षी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. चंडीगडमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे रॉक गार्डन आणि संग्रहालय आहे. जर तुम्हीही चंडीगडला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला इथल्या सुंदर ठिकाणांबद्दल माहिती देत आहोत.
2 / 6
गुलाबांनी भरलेली ही सुंदर गार्डन 30 एकरांवर पसरलेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या नावावरून या गार्डनला नाव देण्यात आले आहे. या गार्डनमध्ये अप्रतिम वास्तुकला आहे, जी फुलांचे सौंदर्य प्रतिबिंबित करते. या गार्डनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे 1500 हून अधिक प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे. जर तुम्हाला हनिमून किंवा रोमँटिक डेटवर जायचे असेल तर चंडीगडमधील झाकीर हुसेन रोज गार्डनला नक्की भेट द्या.
3 / 6
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि शांततेचे ठिकाण शोधत असाल तर टॅरेसर्ड गार्डन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. येथील सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालेल.
4 / 6
देशभरात इस्कॉनची अनेक मंदिरे असली तरी चंडीगडमधील इस्कॉन मंदिर ही वेगळी बाब आहे. हे मंदिर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इस्कॉन मंदिर हे चंडीगडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. येथे दररोज भाविकांची गर्दी असते. इस्कॉन मंदिर हे चंडीगडमध्ये भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
5 / 6
सुखना लेक सुमारे 3 किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. याठिकाणी अनेक स्थलांतरित पक्षी येतात. तुम्ही येथे सारस आणि सायबेरियन बदके देखील पाहू शकता. जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल किंवा फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही वॉटर स्कीइंग, फिशिंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता. सुखना लेक हे चंदीगडमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
6 / 6
रॉक गार्डन हे चंडीगडमधील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर इथे तुम्हाला असे काही सापडेल जे तुम्हाला खूप आकर्षित करेल. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह चंडीगडला सुट्टी घालवण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी रॉक गार्डन हे एक उत्तम ठिकाण आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत