अंबरनाथमधील नववर्ष शोभा यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 15:10 IST2018-03-18T15:09:43+5:302018-03-18T15:10:10+5:30

अंबरनाथमधील नववर्ष शोभा यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया - पंकज पाटील)

अंबरनाथमध्ये हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला सकाळी 8 वाजता स्वामी समर्थ चौकातील हेरंब मंदिरापासुन सुरुवात करण्यात आली. या यात्रेत महिलांचीच सर्वाधिक गर्दी होती. या यात्रेची सांगता हुतात्मा चौकात करण्यात आली. 

गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन अंबरनाथमध्ये करण्यात आले होते. स्वागत यात्र समितीचा पदभार हा महिला मंडळाकडे देण्यात आल्याने महिलांनी देखील स्वागत यात्रेची जय्यद तयारी केली होती.

यात्रेमध्ये झालेल्या गर्दीत महिलांचा उत्साह हा सर्वाचे आकर्षण ठरले होते. सर्वाधिक गर्दी ही केवळ महिलांचीच झाली होती. ढोल पथक, लेझिम पथकांसह अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला.