चौदा वर्षांच्या अफेअरनंतर दिग्गज खेळाडू अडकला विवाह बंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:20 AM2019-10-20T10:20:44+5:302019-10-20T10:22:17+5:30

18 ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर असलेल्या टेनिसपटू राफेल नदालनं शनिवारी प्रेयसी मारिया फ्रेंसिस्का पेरेलोसोबत विवाह केला.

नदाल आणि मारिया 2005 पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास 14वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी गतवर्षी साखरपुडा केला होता.

गतवर्षी रोममध्ये सुट्टीवर गेले असताना नदालनं प्रेयसी मारियाला लग्नाची मागणी घातली होती.

त्यांच्या लग्नाचा फोटो अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. पण, मारियानं तिच्या अकाऊंटवर लग्नाच्या ड्रेसमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मालोरका येथे दोघांचे लग्न झाले. बिजनेस डिग्री घेतलेली मारिया इनव्हेसमेंट बँकर आहे आणि नदालच्या फाऊंडेशनमध्ये ती प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करते.