By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 19:31 IST
1 / 10ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या स्पर्धेतील फायनलमध्ये २६ वर्षीय एलिना रयबाकिना हिने अव्वल मानांकित आर्यना संबालेंका हिला पराभूत करत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 2 / 10टेनिस कारकिर्दीत तिने जिंकलेली ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. याआधी २०२२ मध्ये तिने विम्बल्डन स्पर्धेच्या रुपात पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. 3 / 10ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह ४.१५ मिलियन बक्षीस जवळपास २ कोटी २४ लाखांची कमाई करणारी एलिना रयबाकिना १५५ ते १६० कोटी रुपयांची मालकीण आहे. व्यावसायिक टेनिससह जाहिरातीच्या माध्यमातून ती तगडी कमाई करते. 4 / 10ज्या कोचच्या मार्गदर्शनाखाली तिने पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली त्या कोचसोबत अफेअर असल्याची गोष्टही चांगलीच गाजली. ATP नं या प्रकरणात संबंधित कोचवर निलंबनाची कारवाई केली होती. 5 / 10एलेना रयबाकिना हिने २०१९ मध्ये स्टेफानो वुकोव यांच्याखाली प्रशिक्षण सुरू केले. रयबाकिना आणि वुकोव जोडी टेनिस विश्वात मोठ्या प्रमाणात कौतुक मिळवत होती. या कोचच्या मार्गदर्शनाखाली रयबाकिनाचा खेळ उंचावला होता. 6 / 10जानेवारी २०२५ मध्ये, WTA ने वुकोवला तातडीने निलंबित केले. त्याच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला होता. रयबाकिनासोबत त्याचे वर्तन चांगले नव्हते. एवढेच नाही तर टेनिस स्टार आणि कोच यांच्यात प्रेमाचा खेळ सुरु होता अशी चर्चाही रंगली. 7 / 10टेनिस स्पर्धेदरम्यान दोघे एकाच रुममध्ये राहायचे ही गोष्टही चर्चेत आली. WTA ने या अफवांबद्दल ना पुष्टी केली ना नाकारले. वुकोव याने निलंबनानाच्या विरोधात अपील केल्यावर हा निकाल त्याच्या बाजूनं लागला. 8 / 10 तो सध्याच्या घडीला रयबाकिनाचा मुख्य कोच नसला तरी तिच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. तिने नेहमीच तो एक चांगला कोच असल्याचे म्हटले आहे. 9 / 10 तो सध्याच्या घडीला रयबाकिनाचा मुख्य कोच नसला तरी तिच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. तिने नेहमीच तो एक चांगला कोच असल्याचे म्हटले आहे. 10 / 10रशियन टेनिस फेडरेशनकडून तिला हवा तसा सपोर्ट मिळत नसल्यामुळे तिने कझाकिस्तानचा रस्ता धरला. कझाकिस्तान टेनिस फेडरेशनने रयबाकिना हिला आर्थिक ते अगदी कोचिंगपर्यंत सर्व सपोर्ट देण्याचे आश्वासन दिल्यावर तिने या देशाकडून टेनिस खेळण्याचा निर्णय घेतला अन् रशियन गर्ल कझाकिस्तानची झाली.