शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंडर डिस्प्ले कॅमेरा, क्वाड कर्व्ह्ड वॉटरफॉल स्क्रिन; पाहा Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन

By जयदीप दाभोळकर | Published: February 08, 2021 7:27 PM

1 / 10
Xiaomi ही कंपनी सातत्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. नव्या तंत्रज्ञानाचाही वापर कंपनी आपल्या अनेक प्रोडक्टमध्ये करत असते. (सर्व फोटो - शाओमी)
2 / 10
Xiaomi नं आता एक नवा कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनद्वारे Xiaomi नं कर्व्ह्ड डिस्प्ले डिझाईन एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्याचा प्रयत्न केलाय.
3 / 10
केवळ बाजूलाच नाही तर वरील आणि खालील बाजूलाही या स्मार्टफोमनध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आलाय. याचमुळे हा फोन चारही बाजूंनी वॉटरफॉलप्रमाणे दिसून येतो.
4 / 10
हा रिव्होल्यूशनरी हायपर क्वाड कर्व्ह्ड ८८ डिस्प्ले तयार करणं इतकं सोपं नव्हतं, असं कंपनीनं म्हटलं.
5 / 10
याला ८०० डिग्री सेल्सिअस तापमानावप हॉट बेंडिंग ग्लासचा वापर करून हा आकार देण्यात आला आहे.
6 / 10
साईडला चारही बाजूंना डिस्प्ले असण्याचा अर्थ असा की हा एक पोर्ट फ्री स्मार्टफोन आहे. तसंच यात वायरलेस चार्जिंगही दिलं गेलं असण्याची शक्यता आहे.
7 / 10
तसंच यासोबत कंपनीनं नुकतंच लाँच केलेल्या Mi Air Charge Technology चादेखील सपोर्ट मिळतो. या तंत्रज्ञानाद्वारे हा स्मार्टफोन ठराविक अंतरावरूनही चार्ज केला जाऊ शकतो.
8 / 10
याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे स्क्रिनवर नॉच दिसून येत नाही.
9 / 10
कंपनीनं हा फोन सध्या कमर्शिअली लाँच केलेला नाही. या फोनमध्ये ई-सिम, प्रेशर सेन्सिटिव्ह टच सेन्सर आणि बिल्ट इन स्पीकर्स देण्यात आले आहेत.
10 / 10
पूर्णप्रकारे हा एक पोर्टलेस डिस्प्ले आहे. मागील बाजूला शाओमीनं आपलं ब्रँडिंगदेखील केलं आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनxiaomiशाओमी