Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:15 IST2025-07-07T15:05:54+5:302025-07-07T15:15:20+5:30
Itel City 100 Price and Specifications: आयटेलने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे.

आयटेलने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन आयटेल सिटी १०० बाजारात लॉन्च करून स्पर्धकांची चिंता वाढवली. कारण कंपनीने हा फोन अवघ्या ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला आहे, ज्यात अनेक आकर्षित फीचर्स देण्यात आले आहेत.
आयटेल सिटी १०० हा फेयरी पर्पल, नेव्ही ब्लू आणि प्युअर टायटॅनियम अशा तीन रंगामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत ७ हजार ९९९ आहे.
या फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेट आणि ७०० nits चा पीक ब्राइटनेससह ६.७५-इंच एचडी प्लस आयपीएस एलसीडी आहे.
फोटोग्राफीसाठी आयटेल १०० सिटीमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्या देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल मिळत आहे.
या फोनमध्ये आयआर ब्लास्टर आहे, तसेच ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखे मानक कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.
आयटेल १०० सिटीमध्ये ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला, जी १८ वॅट जलद चार्जिंगला सपोर्ट करते. आयटेल सिटी १०० मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.