शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel, Jio 5G Plans: एअरटेल, जिओ अजून 5G प्लॅन्स का जाहीर करत नाहीएत; कशाची धास्ती? इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 1:54 PM

1 / 8
देशात ५जी सेवा सुरु करून आता दोन महिने होत आले आहेत. तरीदेखील कंपन्यांनी ५जी डेटा प्लॅन जाहीर केलेले नाहीत. अद्याप ट्रायल म्हणूनच लोकांना ठराविक पॅकच्यावर अनलिमिटेड ५जी सेवा उपलब्ध केली जात आहे. जिओचा स्पीड एवढा फास्ट आहे की ४-५ जीबीचे सिनेमे १५ ते २० सेकंदात डाऊनलोड होत आहेत. अशावेळी दिवसाला दीड-अडीज जीबी डेटा कसा पुरणार असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
2 / 8
असे असले तरी एअरटेल आणि जिओने अद्याप पॅन जाहीर केलेले नाहीत. यामागची कारणे काय आहेत? कंपन्यांनी अद्याप धाडस का केलेले नाहीय. दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क आता ५० हून अधिक शहरांत सुर झाले आहे. दोन्ही कंपन्या विस्तार करत आहेत. मात्र, त्याचा कोणताच चार्ज आकारत नाहीएत.
3 / 8
जिओला तर ४जी आणि ५जी नेटवर्कवर कॉलिंगवेळी समस्या येत आहेत. लोकांचे फोनच लागत नाहीएत. फोन लावायचा असेल तर सेटिंगमध्ये जाऊन ४जी नेटवर्क निवडावे लागत आहे किंवा नेटवर्क फ्लाईट मोडद्वारे रिसेट करावे लागत आहे. एअरटेलने मिनिमम रिचार्जची अट ठेवलेली नाही.
4 / 8
५जी स्पेक्ट्रम खरेदीमध्ये चार कंपन्या होत्या. परंतू दोनच कंपन्यांनी ही सेवा सुरु केली आहे. व्होडाफोन आय़डियाला वेळ लागणार आहे. तर जियो आणि एअरटेलची सेवा अद्याप पूर्णपणे सुरु झालेली नाही.
5 / 8
दोन्ही टेलिकॉम कंपन्यांची 5G सेवा निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या शहरांमध्येही सर्व वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटी मिळत नाही. अशा परिस्थितीत रिचार्ज प्लॅन्स सुरू करणे घाईचे ठरेल, असे कंपन्यांना वाटत आहे.
6 / 8
युजर्स ५जी द्वारे किती डेटा वापरतात, त्यांची आवड काय आहे, किती वेळ ते इंटरनेटवर घालवतात यावर कंपन्यांचे लक्ष आहे. त्याचे विश्लेषण केल्यानंतरच टेलिकॉम कंपन्या त्यांचे प्लॅन लॉन्च करतील. बरेच वापरकर्ते सध्या 5G साठी अतिरिक्त पैसे देऊ इच्छित नसल्यामुळे कंपन्या युजरचा वापर पाहिल्यानंतरच नवीन योजना जाहीर करतील.
7 / 8
टेलिकॉम कंपन्यांसाठी नवीन प्लॅन्स ही त्यांच्या ARPU मध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य संधी असेल. त्यामुळे कंपन्या योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
8 / 8
जेव्हा देशात बहुतांश ठिकाणी 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, तेव्हा कंपन्या रिचार्ज प्लॅन जाहीर करतील. पुढील वर्षीच्या अखेरीस एवढे नेटवर्क विस्तारण्याची शक्यता आहे. यामुळे तेव्हाच हे प्लॅन येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल