Sony Year-End Sale: 74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट

By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 04:16 PM2021-12-18T16:16:34+5:302021-12-18T16:28:37+5:30

Sony Year-End Sale: Sony India नं आपल्या इयर एन्ड सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत कंपनीच्या ब्राविया टेलिव्हिजन, हेडफोन, स्पिकर, कॅमेरा आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात आहेत. हा सेल 16 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत सुरु राहील.

सोनी इयर एन्ड सेलचा फायदा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांद्वारे घेता येईल. कंपनी सोनी टीव्ही मॉडेल्सवर 30 टक्क्यांपर्यंतची सूट आहे तर ऑडियो प्रोडक्टवर 50 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

सोनीच्या एकूण 22 ब्राविया टीव्ही मॉडेल्सवर डिस्काउंट मिळत आहे. यात एक्सआर सीरीज, 4के अल्ट्रा एचडी सीरीज, फुल एचडी सीरीज आणि एलईडी टीव्ही मॉडेल्सचा देखील समावेश आहे. सोनी सेंटरवरून हे टीव्ही मॉडेल्स विकत घेतल्यास 30 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तसेच आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड्सवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. कंपनीनं एक्सटेंडेड वॉरंटीची देखील घोषणा केली आहे.

कंपनीच्या वेबसाईटवरील काही Sony Bravia TV मॉडेल्सवर दोन वर्षांची वॉरंटी मिळत आहे. यात Sony Bravia XR-65A8OJ IN5 चा समावेश आहे. 3,39,900 रुपयांचा हा टीव्ही 2,65,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Sony Bravia KD-55X8OJ टीव्ही 87,390 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची किंमत 1,09,900 रुपये आहे.

सोनीच्या हेडफोन, ट्रूली वायरलेस इयरबड्स, वायर्ड इयरफोन, ब्लूटूथ स्पिकर, साउंडबार आणि होम थिएटर सिस्टमवर देखील डिस्काउंट मिळत आहेत. काही प्रोडक्टस अर्ध्या किंमतीती कंपनीच्या वेबसाईटवरून विकत घेता येतील.

29,990 रुपयांचे Sony WH-1000XM4 हेडफोन्स 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तर Sony WH-H910N साठी 24,990 रुपयांच्या ऐवजी 9,990 रुपये मोजावे लागतील. Sony WH-CH710N वर 7,000 रुपयांचा डिस्काउंट आहे तर WH-XB900N सेलयामध्ये 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

सोनीच्या कॅमेरा मॉडेल्सवर देखील डिस्काउंट दिला जात आहे. तसेच कॅमेरा अ‍ॅक्सेसरीज आणि मेमरी कार्ड्स देखील स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.