शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Netflix : म्हणून आता मित्रमंडळींच्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा करता येणार नाही वापर, असा असेल नवा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:56 PM

1 / 7
नवनवे चित्रपट आणि वेबसिरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्स कमालीचे लोकप्रिय झाले आहे. तुम्हीसुद्धा मित्रांसोबत नेटफ्लिक्सचे अकाऊंट शेअर केलेले असेल. नेटफ्लिक्सचे अकाऊंट आणि पासवर्ड शेअर करणे ही खूप सामान्य बाब बनलेली आहे. त्यामुळे सब्स्क्रिप्शन चार्ज विभागले जातात. मात्र आता अशाप्रकारे अकाऊंट शेअर करणे शक्य होणार नाही. कारण कंपनीने याबाबतचे धोरण बदलण्याची तयारी केली असून, आता अशाप्रकारे अकाऊंट शेअर करणे बंद करण्याचा नेटफ्लिक्सचा विचार आहे.
2 / 7
रिपोर्टनुसार नेटफ्लिक्स एक नव्या फिचरची चाचणी घेत आहे. या फिचरमुळे भविष्यात युझर्सना आपला नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करता येणार नाही. नेटफ्लिक्सची सब्स्क्रिप्शन कॉस्टसुद्धा अधिक आहे. त्यामुळे हे फिचर आल्यानंतर अनेकजण नेटफ्लिक्सला बायबाय करण्याची शक्यता आहे.
3 / 7
Gammawire च्या रिपोर्टनुसार नेटफ्लिक्स आपल्या एक नव्या फिचरची चाचणी घेत आहे. या फिचरमुळे शेअर अकाऊंटमध्ये लॉगइन केलेल्या लोकांना वॉर्निंग देण्यात येईल. यामध्ये अशा युझर्सला इशारा दिला जाईल. जे सब्स्क्राइब्ड यूझरच्या कुटुंबाचा हिस्सा नसेल. मिळत असलेल्या माहितीनुसार काही लोकांना अशा प्रकराचे वॉर्निंग मेसेज मिळालेले आहेत. यामध्ये ते त्यांचं नेटफ्लिक्स अकाऊंट वापरत असतील वा नसतील. त्यांना आपले अकाऊंट व्हेरिफाय करण्यास सांगण्यात आले आहे.
4 / 7
जर तुम्ही आपल्या कुठल्या मित्राचे अकाऊंट वापरत असाल तर तुम्हाला त्याच्याकडून व्हेरिफिकेशन कोड घ्यावा लागेल. व्हेरिफिकेशन कोड अकाऊंट होल्डरच्या नंबरवरच पाठवला जाईल. जर तुमचे मित्रासोबतचे संबंध चांगले नसतील तर तुम्हाला कोड घेण्यासाठी अडचणी येतील.
5 / 7
या नव्या फिचरच्या टेस्टिंगदरम्यान, काही युझरच्या समोर एक पॉपअप येत आहे. या पॉप अपमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही अकाऊंटच्या ओनरसोबत राहत नसाल तर तुम्हाला नेटफ्लिक्स पाहण्यासाठी स्वत:च्या अकाऊंटची गरज भासेल. जर युझर व्हेरिफिकेशन कोड त्वरित व्हेरिफाय करू शकला नसाल तर त्यांच्याजवळ व्हेरिफाय लेदरचा पर्यायसुद्धा दिला जाऊ शकतो. तसेच नवीन अकाऊंट बनवून सब्स्क्रिप्शनसुद्धा घेऊ शकता.
6 / 7
नेटफ्लिक्स भारतामध्ये २९९ रुपयांचा मोबाइल प्लॅनसुद्धा टेस्ट करत आहे. हा प्लॅन केवळ मोबाइलसाठी असेल. या प्लॅनच्या माध्यमातून युझर वेब सीरिज आणि चित्रपट आपल्या मोबाइलवर बघू शकतील. सध्या या प्लॅनची केवळ चाचणी घेतली जात आहे. आतापर्यंत हा प्लॅन लॉन्च करण्यात आलेला नाही.
7 / 7
नेटफ्लिक्सचे हे फिचर कंपनीसाठी फायदेशीर ठरेल की यामुळे कंपनीचे भारतातील ग्राहक नाराज होतील हे भविष्यात दिसून येईल, जेव्हा या फिचरची सुरुवात होईल.
टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सonlineऑनलाइनbusinessव्यवसायIndiaभारत