स्मार्टफोन तुमच्या सर्व गोष्टी एकतोय, या ६ सोप्या मार्गांनी सुरक्षित रहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:17 IST2025-03-07T16:00:09+5:302025-03-07T16:17:53+5:30
तुमचा मोबाईल तुम्ही बोलत असलेल्या सर्व गोष्टी ऐकत असतो. हे सर्व जर बंद करायचे असेल तर तुम्हाला काही सेटींग करावे लागतील.

तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला कधी कधी वाटत असेल की तुमचा फोन तुमच्या सर्व गोष्टी ऐकतोय. तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलता त्याविषयीच्या गोष्टी आपल्याला जाहिराती किंवा सोशल मीडियावर येत असतात. या स्मार्टफोनमुळे आता आपली गोपनीय माहिती सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आता आपल्या गोपनीय माहितीचा वापर घोटाळेबाज करत असल्याचे समोर आले आहे. वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये साठवलेल्या डेटाद्वारे त्यांची हेरगिरी केली जात नाही तर त्यांची फसवणूक देखील केली जात आहे. याबाबतच्या चिंता अनेक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
अनेकवेळा आपण एखाद्या उत्पादनाबद्दल बोलत असतो, यानंतर काहीवेळातच आपल्या स्मार्टफोनवर त्या उत्पादनांच्या जाहीरातील आल्या जातात. यामुळे आपलं बोलणं स्मार्टफोन आपले ऐकत आहे का?, असा संशय येतो. जर असं असेल तर ते कसं बंद करता येईल? हे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला कोणत्या सेटिंग्ज बदलाव्या लागतील.
अनेक वेळा आपण स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या अॅप्सना कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्टोरेजचा अॅक्सेस देतो. असे केल्याने, हे अॅप्स आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात. अशा परिस्थितीत, स्मार्टफोनमध्ये असलेल्या अॅप्सना फक्त आवश्यक परवानग्या देणे महत्वाचे आहे. अनावश्यक अॅप्सना परवानग्या देऊ नका.
तुमची हेरगिरी करण्यासाठी फोन कॅमेरा आणि माइकचा वापर केला जातो. जर तुमच्या फोनचा कॅमेरा किंवा माइक कोणत्याही गरजेशिवाय सक्रिय केला असेल तर तुम्ही तो शोधू शकता. जेव्हा जेव्हा फोनचा कॅमेरा किंवा माइक चालू असतो तेव्हा स्क्रीनवर हिरवा दिवा चमकत असतो.
तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या अॅप्सच्या परमिशन मॅनेज करण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्ज मेनूमध्ये जावे लागेल. यानंतर, तुम्हाला प्रायव्हसी अंतर्गत परमिशन मॅनेजरमध्ये जाऊन अॅप परवानग्या मॅनेज कराव्या लागतील.
येथे तुम्ही मायक्रोफोन, कॅमेरा आणि लोकेशन यासारख्या अॅपला कोणता अॅक्सेस देण्यात आला आहे ते पाहू शकाल. यात तुम्ही मजबूत गोपनीयता ठेवण्यासाठी, आपण फक्त आवश्यक असलेल्या अॅप्सना परवानगी दिली पाहिजे.
स्मार्टफोन कंपन्या दर महिन्याला किंवा नियमित अंतराने त्यांच्या उपकरणांसाठी सुरक्षा अपडेट्स देत असतात. यासोबतच, फोनमध्ये इंस्टॉल केलेले अॅप्स वेळोवेळी अपडेट करत रहा. तुमचा फोन अपडेटेड ठेवल्याने तुमची सुरक्षा मजबूत होते आणि तुमचा फोन स्पायवेअर आणि मालवेअरपासून सुरक्षित राहतो.
जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल असिस्टंट, सिरी किंवा अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट वापरत नसाल तर ते बंद ठेवा. व्हॉइस असिस्टंट बंद ठेवण्यासाठी, सेटिंग्जमध्ये व्हॉइस असिस्टंटवर जा आणि ते बंद करा. यामुळे गरज असेल तेव्हाच फोनचा मायक्रोफोन चालू होईल.
पब्लिक वाय-फाय असुरक्षित आहे. डेटा वापरासाठी मोफत वाय-फाय टाळा. यामुळे, तुमचा डेटा चोरीला जाण्याचा आणि हॅक होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला पब्लिक वाय-फाय वापरण्याची सक्ती केली जात असेल तर नक्कीच VPN चालू करा.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅप्स इन्स्टॉल करा. यासोबतच, थर्ड पार्टी अॅप स्टोअर्समधून अॅप्स इन्स्टॉल करणे बंद करा. तसेच तुमच्या स्मार्टफोनला वेळोवेळी रिस्टार्ट करा.