सुरु झाला Realme चा ‘समर सेल’; स्मार्टफोन्सवर 5 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:08 IST2022-06-03T15:55:50+5:302022-06-03T16:08:06+5:30
Realme Summer Sale 2022 मध्ये अनेक स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत. काही फोन्स 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत.

Realme Narzo 30 5G
Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल कंपनीच्या वेबसाईटवर 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या सेलमध्ये हा डिवाइस 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. जो प्रीपेड ऑर्डरवर मिळेल.
Realme Narzo 50
17,000 रुपयांचा Realme Narzo 50 चा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच यावर 1500 रुपयांचा प्रीपेड ऑर्डर डिस्काउंट दिला जात आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना 1500 रुपयांची सूट देखील मिळेल.
Realme 9 5G SE
Realme 9 5G SE स्मार्टफोनचा 6GB रॅम व्हेरिएंट इतरवेळी 24,999 रुपयांमध्ये विकला जातो. परंतु सेलमध्ये हा फोन फ्लिपकार्टवर 19,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. सोबत 2000 रुपयांचा एचडीएफसी कार्ड डिस्काउंट आणि 1000 रुपयांचा प्रीपेड डिस्काउंट देखील मिळेल. म्हणजे या फोनची किंमत 16,999 रुपये होईल.
Realme 9
Realme 9 ची मूळ किंमत 20,999 रुपये आहे, फ्लिपकार्ट मात्र याची विक्री 17,999 रुपयांमध्ये करत आहे. 1000 रुपयांचा प्रीपेड ऑर्डर डिस्काउंट आणि 2000 रुपयांची एचडीएफसी बँकेच्या कार्डवरची सूट स्मार्टफोनची किंमत आणखी कमी करते.
Realme 9 5G
Realme 9 5G ची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. प्रीपेड ऑर्डर आणि एचडीएफसी कार्ड डिस्काउंट मिळून तीन हजार रुपये आणखी वाचतील.
Realme 9 Pro+ 5G
Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर हा फोन 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. प्रीपेड ऑर्डरवर तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट मिळेल. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.
Realme GT 2 Pro
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन कंपनीच्या वेबसाईटवर 49,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. सेलमध्ये प्रीपेड ऑर्डर केल्यास ग्राहकांना 5 हजार रुपयांची सुट मिळेल.