4 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme चे स्मार्टफोन्स उपलब्ध; फ्लॅगशिप फोन देखील झाले स्वस्त

By सिद्धेश जाधव | Published: December 15, 2021 03:58 PM2021-12-15T15:58:28+5:302021-12-15T16:13:58+5:30

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्स डे सेलची सुरुवात झाली आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Realme काही दमदार स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया ऑफर्स.

फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डे सेल सर्वांसाठी उदयपासून खुला होणार असला तरी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स आजपासूनच या सेलमधील ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात. तसेच रियलमीच्या वेबसाईटवर देखील या ऑफर्स उपलब्ध आहेत.

1,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं या बजेट स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि Unisoc T610 चिपसेट दिला आहे.

सेलमध्ये या फोनसाठी फक्त 19,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, मीडियाटेक डायमेंसिटी 810 5G, 5000mAh ची बॅटरी आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग, असे फीचर्स यात मिळतात.

या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो G95 चिपसेट मिळतो. तसेच यात पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 64MP चा कॅमेरा असलेल्या या फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटवर 1500 रुपये आणि 8 जीबी रॅम व्हेरिएंटवर 2 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

Realme GT Master Edition वर देखील 4 हजार रुपयांची सूट मिळत आहेत. या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 64 मेगापिक्सलचा रियर आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलवर 4 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा फोन 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 हा फ्लॅगशिप प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळते.

या सेलमधील महत्वाची सूचना म्हणजे हा डिस्काउंट प्रीपेड ऑर्डर्सवर मिळणार आहे. म्हणजे हा डिस्काउंट मिळवण्यासाठी आधी पेमेंट करावं लागेल. कॅश ऑन डिलिव्हरीवर सूट मिळणार नाही.