मोबाईलचा डिस्प्ले फुटायचे टेन्शन नको; ही कंपनी देणार 12 हजार तात्काळ रोख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:28 IST2019-07-16T11:25:43+5:302019-07-16T11:28:17+5:30

मोबाईलच्या डिस्प्लेला खूप महत्व आहे. ज्यांचा फोन सारखा पडत असतो त्यांना डिस्प्ले फुटण्याची भीती सतावत असते. बऱ्याचदा अशा लोकांचा डिस्प्ले फुटतच नाही. पण एखाद्याचा कितीही सांभाळलेला फोन एकादा पडला तरीही डिस्प्ले कामातून जातो. हा डिस्प्ले बदलण्याचा खर्चही 8-10 हजार रुपयांत असतो. तेवढी त्या मोबाईलची किंमतही नसते.

घाबरू नका तुमच्यासाठी एक कंपनी धावून आली आहे. नवीन मोबाईल घेताना फोनचा विमा काढतात हे तुम्हाला माहिती असेलच. पण आता जुन्या मोबाईलच्या डिस्प्लेचाही विमा काढता येणार आहे. भारतात ही सुविधा गो डिजिट जनरल इन्शूरन्स (Go Digit General Insurance) नावाची कंपनी देत आहे. ही कंपनी विम्याची सुविधा आधीपासूनच देत होती मात्र, जुन्या फोनसाठी ही योजना पहिल्यांदाच आणली आहे.

यासाठी तुम्हाला एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. हे अॅप तुमच्या फोनचा अॅक्सेस घेणार आहे. तसेच विम्याचा क्लेमही ऑनलाईनच मिळणार आहे. तसेच कंपनी अॅपद्वारे तुमच्या फोनचा डिस्प्ले पहिल्यापासूनच खराब नाही ना याची तपासणीही करणार आहे.

हे सॉफ्टवेअर जुने फोन खरेदी करणाऱ्या कॅशीफाय सारखेच आहे. विम्याच्या सॉफ्टवेअरद्वारे फोनची कंपनी, आयएमईआय नंबर आणि मॉडेसंबंधीची माहिती घेतली जाणार आहे.

हा विमा घेण्यासाठी तुम्हाला 1700 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यानंतर जर तुमच्या फोनची स्क्रीन फुटली आणि जर 12 हजार रुपयांचा खर्च येत असेल तर कंपनी तुम्हाला 12 हजार रुपये रोख देणार आहे.

तुम्ही या पैशांतून डिस्प्ले बदलू शकता किंवा नवीन फोन घेऊ शकणार आहात. एका इंग्रजी वृत्तपत्राला या कंपनीचे अध्यक्ष कमेश गोयल यांनी ही माहिती दिली आहे. सुरुवातीला या योजनेमध्ये मोजकेच मोबाईल आहेत.

















