शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वर स्टेट्ससाठी आले नवे खास फिचर; जाणून घ्या काय झाला बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 10:07 AM

1 / 7
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवे फिचर देत असते. वापरकर्त्यांच्या आवडीच्या सुविधा देण्यासाठी WhatsAppची टीम प्रयत्न करत असते. WhatsApp आता Rich Link Preview फिचर सुरू करणार आहे. यात तुम्हाला स्टेरमध्ये लिंक प्रीव्हू करता येणार आहे. हे फिचर काम कसे करते हे जाणून घेऊया.
2 / 7
WhatsApp आपल्या Android आणि iOS फोनमध्ये नवे फिचर लाँच करमार आहे. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअॅपच्या बीटा फिचरमध्ये Rich Link Preview हे फिचरचे ऑप्शन जनरेट केले होते. WhatsApp ने या संदर्भात माहिती दिली आहे.
3 / 7
व्हॉट्सअॅपने iOS च्या स्टेबल व्हर्जन 22.22.75 मध्ये रोलआउट केले आहे. जर तुम्हाला हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. हे फिचर खास स्टेटससाठी अपडेटसाठी बनवण्यात आले आहे.
4 / 7
हे फीचर आल्यानंतर युजर स्टेटसमध्ये लिंक शेअर करेल तेव्हा त्याच्यासोबत प्रिव्ह्यू देखील दिसेल. तो प्रत्यक्षात कसा दिसेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही WB ने शेअर केलेला स्क्रीनशॉट देखील पाहू शकता.
5 / 7
तुम्हाला हे रिच लिंक फीचर मिळाले आहे की नाही हे देखील तपासायचे असेल, तर तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये URL सह कोणतेही मजकूर स्टेटस अपडेट करा, त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू दिसला तर समजून घ्या की तुम्हाला हे फीचर मिळाले आहे.
6 / 7
आता हे फिचर काही वापरकर्त्यांना मिळाले आहे, पण येणाऱ्या काही दिवसात सर्व वापरकर्त्यांना हे फिचर मिळणार आहे. यासाठी आपल्याला WhatsApp अपडेट करावे लागणार आहे.
7 / 7
जर तुम्ही अँड्रॉईड वापरकर्ता असाल आणि तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला या अपडेटची वाट पाहावी लागणार आहे. हे फीचर अँड्रॉईड व्हर्जनवर कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया