शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 18:38 IST

1 / 5
टेलिकॉम कंपनी MTNL खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एकाचडी एक प्लॅन देत आहे. असाच एक प्लॅन 225 रुपयांचा देखील आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे, याची वैधता एक दिवस, एक महिना अथवा एक वर्षाची नसून संपूर्ण आयुष्यासाठीची आहे.
2 / 5
MTNL चा 225 रुपयांचा प्लॅन लाईफटाईम व्हॅलिडिटीसह येतो. यात युजर्सना इतरही अनेक बेनिफिट्स मिळतात. हा प्लॅन Airtel, Jio, Vi आणि अगदी BSNL लाही जबरदस्त टक्कर देत आहे. तर जाणून घेऊयात कंपनीच्या या स्वस्त प्लॅन संदर्भात.
3 / 5
या प्लॅनची किंमत 225 रुपये एवढी आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 100 मिनिटे दिली जात आहेत. तसेच, युजर्सना सिम आणि खात्याची वैधता लाईफटाईम असते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्सना प्रति सेकंद 2 पैसे एवढे शुल्क द्यावे लागेल. याच पद्धतीने, युजर्सना व्हिडिओ कॉलिंगसाठी 60 पैसे प्रती मिनिट एवढे शुल्क द्यावे लागेल.
4 / 5
याशिवाय, SMS संदर्भात बोलायचे झाल्यास, लोकल एसएमएससाठी 50 पैसे प्रती एसएमएस, 1.50 रुपये प्रती एसएमएस आणि 5 एसएमएससाठी 4 रुपये द्यावे लागतील. तसेच डाटा संदर्भात बोलायचे झाल्यास, प्रती एमबी 3 पैसा एवढे शुल्क द्यावे लागेल.
5 / 5
Airtel, Jio, Vi आणि BSNL ला मोठी टक्कर - एमटीएनएलचा हा प्लॅन सरकारी कंपनी BSNL सह Airtel, Jio आणि Vi या खासगी टेलिकॉम कंपन्यांनाही जबरदस्त टक्कर देत आहे. कारण, यांपैकी कोणत्याही कंपनीकडे, अशा यापद्धतीचा प्लॅन नाही. यांपैकी कोणतीही कंपनी लाईफटाईम वैधता असलेला प्लॅन देत नाही. यामुळे MTNL च्या या प्लॅनकडे युजर्स मोठ्या प्रमाणावर आकर्शित होऊ शकतात. एढेच नाही, तर, आपणही MTNL ला सेकेंडरी सिम म्हणून वापरू शकतात.
टॅग्स :MTNLएमटीएनएलBSNLबीएसएनएलAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाJioजिओ