शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोटरोलाचे दोन नवे फोन लाँच; पहा किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 5:43 PM

1 / 7
चीनी कंपनी लिनोवोच्या मालकीची कंपनी मोटोरोलाने आज दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. Moto G7 आणि Motorola One असे या फोनची नावे आहेत. या दोन्ही फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि ड्युअल रिअर कॅमेरासारखे फिचर देण्यात आले आहेत.
2 / 7
Moto G7 स्मार्टफोन 6.24 इंचाचा फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. रिझोल्यूशन 1080x2270 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.8 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम दिली आहे. इंटरनल स्टोरेज 64 जीबी आहे. स्टोरेज कार्डद्वारे ही मेमरी 512 जीबी पर्यंत वाढविता येते. 3000 एमएएचची बॅटरी 15 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
3 / 7
12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 5 मेगापिक्सलच्या कॅमेरासह देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
4 / 7
12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 5 मेगापिक्सलच्या कॅमेरासह देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
5 / 7
तर मोटरोला वन मध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. रिझोल्यूशन 720x1520 पिक्सल आहे.
6 / 7
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर सोबत अॅड्रीनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. 4 जीबीची रॅम 64 जीबी सोबत असून 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येऊ शकते.
7 / 7
कॅमेरा 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
टॅग्स :MobileमोबाइलLenovoलेनोव्हो