1 / 10एकीकडे स्मार्टफोन कंपन्या परवडणाऱ्या श्रेणीतून महागड्या म्हणजेच ४०-५० हजारांचे चांगले कॅमेरा, प्रोसेसर आणि डिस्प्ले असणारे स्मार्टफोन बाजारात आणत असताना त्या फोनना टक्कर देण्यासाठी २५ हजारांच्या बजेटमध्ये हेच सारे देणारा एक स्मार्टफोन दाखल झाला आहे. मोटोरोलाने आपल्या 'एज' सीरिजमध्ये Motorola Edge 70 Fusion लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आम्ही ८-१० दिवसांपासून वापरत आहोत. होळीचे रंग, पाणी आणि उन अशा सर्व कंडीशनमध्ये हा फोन वापरला, त्याच्या नव्या कॅमेरामधून फोटोही काढले आणि होळीच्या रंगाचे त्यावर डाग पडले की नाहीत, हे देखील पाहिले. हा फोन आम्हाला कसा वाटला चला पाहुयात...2 / 10Motorola Edge 70 Fusion फोनमध्ये 'लिनेन-प्रेरित फॅब्रिक फिनिश' देण्यात आले आहे, जे हाताला काहीसे मऊ आणि प्रीमियम स्पर्श देते. होळीच्या काळातच हा फोन लाँच होत असल्याने आम्हाला त्यावर होळीच्या रंगांचा काय परिणाम होतो हे तपासण्याची संधी मिळाली. या फोनमध्ये IP68 + IP69 पाणी, धूळीचे रेटिंग होते. यामुळे फारशी चिंता वाटली नाही. मागच्या बाजुचे लिनेनसारखे भासणारे फॅब्रिक फिनिश पांढऱ्या रंगाचे असल्याने त्यावर रंग आपली छाप सोडणार अशी अपेक्षा होती. परंतू, तसे काही घडले नाही. हाताचे रंगाचे ठसे उमटले परंतू ते बऱ्याच वेळाने पुसल्यावर गायब देखील झाले. 3 / 10या फोनमध्ये ६.७८ इंचाचा १.५के ट्रू कलर क्वाड-कर्व्ह एमोलेड डिस्प्ले आहे. जो सध्याच्या दोन बाजुंच्या कर्व्ह डिस्प्लेंपेक्षा वेगळा फिल देतो. १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे व्हिडिओ पाहण्यासोबतच पॅन्टोन स्किनटोनमुळे फोटो पाहतावेळी देखील रंगसंगती नैसर्गिक वाटते. ५२०० नीट्सची पीक ब्राइटनेस यामध्ये देण्यात आला आहे, यामुळे उन्हातही आम्ही स्क्रीन उत्तमरित्या पाहू शकत होतो. 4 / 10मोटरोलाने स्मार्टफोनमध्ये पहिलाच LYT-710 सेन्सरचा वापर केला आहे. ५० मेगापिक्सेलचा हा सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येतो. या कॅमेरामुळे चांगले फोटो क्लिक करता येतात. पोर्ट्रेट मोडमध्ये देखील तुम्हाला डीएसएलआर सारखे फोटो काढता येतात. काही ठिकाणी आम्हाला पोर्ट्रेट मोडवर माणसाचा फोटो बॅकग्राऊंड ब्लर करताना नीट कट होत नसल्याचे दिसले. 5 / 10रिअल टाइममध्ये फोटोची गुणवत्ता सुधारण्यासाठी मोटो एआयचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोटो चांगले काढता येत आहेत. १३ एमपी अल्ट्रा-वाइड + मॅक्रो आणि ३२ एमपी फ्रंट कॅमेरा सिनेमॅटिक ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. व्हिडीओ देखील चांगल्या क्वालिटीचे रेकॉर्ड केले गेले. फोटो काढून झाल्यानंतर देखील तुम्ही एआयद्वारे एडिट करू शकता, तसेच शेअर करताना ओरिजिनल किंवा एनहान्स करून पाठवू शकता. आम्हाला वाटते की ओरिजिनल पेक्षा एनहान्स करून फोटो पाठविणे खूप फायद्याचे ठरू शकते. 6 / 10सध्या सर्वच कंपन्या ७००० mAh च्या बॅटरीकडे वळल्या आहेत. या फोनमध्ये देखील ही मोठी बॅटरी आहे. तरीही हा फोन जड वाटत नाही. या फोनसोबत ६८ वॅट टर्बोपावर चार्जर देण्यात आला आहे. जो साधारण दीड तासात बॅटरी चार्ज करतो. तसेच हा बॅटरी बॅकअप सव्वा दोन दिवस पुरतो. या फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ७एस जेन ४ (Snapdragon 7s Gen 4) प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे अॅपवरील सर्फिंग, बाऊझिंग आणि स्विचिंग स्मूथ होत होते. वापरावेळी फोन थंड ठेवण्यासाठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे, जी उन्हातही आम्हाला चांगली काम करताना आढळली. 7 / 10Motorola Edge 70 Fusion हा फोन ८ जीबी/१२८ जीबी स्टोरेज पासून १२ जीबी/२५६ जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारांत मिळतो. फार जास्त स्मार्टफोनचा वापर नसेल तर ८ जीबी मेमरी ठीक आहे. कारण जर अधेमध्ये जास्त वापर होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त ४ जीबी मेमरीचा सपोर्टही मिळतो. यामुळे ८ जीबी/२५६ जीबी स्टोरेज हे आम्हाला व्हॅल्यू फॉर मनी व्हेरिअंट वाटले. 8 / 10हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित 'हॅलो यूआय' वर चालतो. मोटो एआय २.०, गुगल जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट को-पायलट यांसारख्या एआय टूल्समुळे तुमची दैनंदिन कामे अधिक सोपी होतात. 'स्केच टू इमेज' आणि 'कॅच मी अप' सारखी फीचर्स देखील यात आहेत. 9 / 10डॉल्बी एटमॉस असलेला हा एवढ्या कमी किंमतीतील पहिला स्मार्टफोन आहे. तुम्हाला हेडफोन्सद्वारेही डॉल्बी एटम़ॉस सेट करता येते. यामुळे तुमच्या मुव्ही पाहण्याचा अनुभव चांगला होतो. शिवाय दोन्ही बाजुला स्पीकर असल्याने व्हिडीओ पाहताना देखील चांगला अनुभव येतो. 10 / 10Motorola Edge 70 Fusion हा स्मार्टफोन २६ हजारांपासून मिळतो. ज्यांचे बजेट ३५-४० हजारांचे फोन घेण्याचे नाहीय त्यांच्यासाठी, चांगला कॅमेरा हवा असलेल्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. प्रोसेसर चांगला आहे, यामुळे गेमही यावर हेवी गेमही खेळता येतात. सेल्फी देखील चांगले येतात. एआय बेस असल्याने तुम्हाला दैनंदिन कामे देखील एआयच्या मदतीने करता येणार आहेत. प्री इन्स्टॉल अॅप नाहीत, ही एक जमेची बाजू आहे.