By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:00 IST
1 / 5इंडक्शन कुकटॉप: शहरांमध्ये इंडक्शन कुकटॉप हा गॅसचा सर्वात लोकप्रिय पर्याय बनला आहे. बाजारात साधारणतः ₹२,००० ते ₹५,००० दरम्यान उत्तम इंडक्शन उपलब्ध आहेत. हे वापरण्यास सुरक्षित आणि स्वच्छ असल्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गात याची मोठी मागणी आहे.2 / 5इन्फ्रारेड कुकटॉप: हे उपकरण दिसायला इंडक्शनसारखेच असले तरी त्याचे कार्य वेगळे आहे. यात काचेची प्लेट गरम होऊन अन्न शिजवले जाते. यासाठी विशेष इंडक्शन भांड्यांची गरज नसते. तुम्ही घरातील कोणत्याही प्रकारची भांडी यावर वापरू शकता, त्यामुळे अनेक जण याला इंडक्शनपेक्षा अधिक सोयीस्कर मानतात.3 / 5इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा मल्टी-कुकर: एकटे राहणाऱ्यांसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी हे एक स्मार्ट गॅझेट आहे. यात तांदूळ, डाळ, भाज्या आणि सूप सहज शिजवता येते. अनेक मॉडेल्समध्ये टाइमर आणि ऑटो-कुकिंग मोड असल्याने जेवण जळण्याची भीती राहत नाही. हे ई-कॉमर्स साईट्सवर सहज उपलब्ध आहेत.4 / 5कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन: मायक्रोवेव्हचा वापर फक्त अन्न गरम करण्यासाठी होतो, हा समज आता जुना झाला आहे. कन्व्हेक्शन मायक्रोवेव्हचा वापर करून तुम्ही बेकिंग, ग्रिलिंग आणि विविध पदार्थ शिजवू शकता. याचा योग्य वापर केल्यास गॅसचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो.5 / 5एअर फ्रायर: गेल्या काही वर्षांत एअर फ्रायर हे एक बहुउपयोगी गॅझेट म्हणून समोर आले आहे. सुरुवातीला फक्त तळण्यासाठी वापरले जाणारे हे उपकरण आता बेकिंग आणि ग्रिलिंगसाठीही वापरले जाते. भाज्या, पनीर, स्नॅक्स आणि अगदी केक तयार करण्यासाठीही लोक याचा वापर करत आहेत. आरोग्यासाठी जागरूक असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.