5G नंतरही जिओचे 'हे' 4G प्लॅन हिट, अनलिमिटेड कॉल्स-डेटासह Netflix, Amazon Prime व Hotstar मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:30 PM2022-10-18T15:30:32+5:302022-10-18T15:44:36+5:30

Reliance Jio : रिलायन्स जिओने (Reliance Jio) 12 प्री-पेड प्लॅन बंद केले आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने (Reliance Jio) दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि कोलकाता या चार शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. परंतु उर्वरित शहरांमध्ये पुढील वर्षी जिओ 5G नेटवर्क मिळणार आहे. अशा परिस्थितीत सध्या युजर्ससाठी जिओ 4G हा एकमेव पर्याय आहे.

अशा युजर्ससाठी जिओने 4G प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे (Disney + Hotstar) मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाही दिला जात आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) 12 प्री-पेड प्लॅन बंद केले आहेत.

हा 4G प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनच्या पहिल्या बिल सायकलमध्ये एकूण 75 जीबी डेटा दिला जात आहे. या बिल सायकलनंतर युजर्सना 10 रुपयांमध्ये 1 जीबी ऑफर दिली जाते. यासोबतच दररोज 1000 एसएमएसची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहेत.

या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हर आणि 100GB डेटा उपलब्ध आहे. यानंतर 10 रुपये प्रति जीबी डेटा आकारला जातो. या प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि एक अतिरिक्त जिओ सिम देण्यात येत आहे.

या प्लॅनमध्ये एकूण 150GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 200GB डेटा रोलओव्हर आणि दोन फॅमिली जिओ सिम प्लॅनसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

या प्लॅनमध्ये एकूण 200GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 3 जिओ सिम देण्यात आले आहेत. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्येनेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

जिओचा हा सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 300 GB डेटा दिला जात आहे. डेटा संपल्यानंतर 10 रुपये प्रति जीबी डेटा ऑफर केला जाईल. या प्लॅनमध्ये 500GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये फ्री नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील.