शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बजेटचा 'बादशाह'! 9,999 मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा अन् 8 जीबी रॅम, पाहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:32 IST

1 / 6
Lava Blaze Dragon 5G: तुम्ही 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भारतीय कंपनी Lava चा Blaze Dragon तुमच्यासाठी योग्य आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5G सपोर्ट तर मिळेलच, पण व्हर्च्युअल रॅम, 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि 5000 mAh शक्तिशाली बॅटरीदेखील मिळेल.
2 / 6
अँड्रॉइड 15 आउट ऑफ द बॉक्सवर काम करणाऱ्या या फोनला अँड्रॉइड 16 अपडेटही मिळेल. कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, या फोनला दोन वर्षांसाठी सेक्युरिटी अपडेट्स मिळत राहतील.
3 / 6
या 5G स्मार्टफोनमध्ये फक्त एकच व्हेरिएंट आहे, जो 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. या व्हेरिएंटसाठी तुम्हाला 9,999 रुपये खर्च करावे लागतील. या फोनची विक्री 1 ऑगस्टपासून Amazon वर सुरू होईल. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल दरम्यान, तुम्हाला 1000 रुपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटचा फायदा देखील मिळेल.
4 / 6
या किंमत श्रेणीमध्ये, Lava कंपनीचा हा 5G स्मार्टफोन Poco C75 5G (किंमत 8499 रुपये), Motorola G35 5G (किंमत 9999 रुपये) आणि Vivo T4 Lite 5G (किंमत 9999 रुपये) सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
5 / 6
या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.74 इंचाचा HD प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. तसेच, या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 3 जनरेशन 2 चिपसेट वापरण्यात आला आहे.
6 / 6
फोनमध्ये 4 GB पर्यंत RAM आहे, जी तुम्ही व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने 8 GB पर्यंत वाढवू शकता. मागील बाजूस 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे.
टॅग्स :lavaलावाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान