एकापेक्षा एक भारी Smartphones! पुढील आठवड्यात होणार विक्री, फीचर्सपाहून बदलेल तुमचा निर्णय
By सिद्धेश जाधव | Updated: April 30, 2022 19:29 IST2022-04-30T19:20:55+5:302022-04-30T19:29:42+5:30
नवीन फोन घेत असाल तर काही दिवसांपूर्वी आलेल्या या जबरदस्त फोन्सचा नक्की विचार करा. पुढे आम्ही अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे पुढील आठवड्यात पहिल्यांदाच विक्रीसाठी येत आहेत. हे मोबाईल तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता.

Micromax In Note 2C
1 मेपासून या स्वदेशी डिवाइसची विक्री सुरु होईल. मायक्रोमॅक्सच्या स्मार्टफोनची किंमत फक्त 7,499 रुपये आहे आणि यात एचडी+ डिस्प्ले, चांगली बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल.
Moto G52
बजेट सेगमेंटमध्ये मोटोरोलानं देखील आपला नवा डाव टाकला आहे. ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअपसह यात 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. या स्मार्टफोनची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 3 मेला दुपारी 12 वाजता पहिल्या सेलसाठी उपलब्ध होईल.
Vivo T1 Pro 5G
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 64MP चा कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंगसह जबरदस्त स्पेक्स मिळतात. हा फोन 4 मेला दुपारी 12 वाजता पहिल्या सेलसाठी येणार आहे. या फोनची किंमत 15 ते 20 हजार दरम्यान असू शकते.
Realme GT Neo 3
150W फास्ट चार्जिंग असलेला हा रियलमी फोन 29,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. फक्त चार्जिंग नव्हे तर अन्य स्पेक्स देखील दमदार देण्यात आले आहेत. हा फोन 4 मेला दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.
Poco M4 5G
पोकोचा 5G स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये 5 मेला दुपारी 12 वाजता खरेदी करता येईल. हा भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल्स पैकी एक आहे.