कोरोना लसीकरण नोंदणी करताना 'या' ५ चुका अजिबात करू नका; नुकसान टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 08:02 PM2021-03-08T20:02:05+5:302021-03-08T20:08:32+5:30

देशातील कानाकोपऱ्यात आता लस उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र, लसीची चुकीची माहिती देऊन लोकांना मेसेज, ई-मेल आणि सोशल मीडियावर चुकीचे माहिती सांगून काही जण याचा गैरफायदा घेत आहेत, असे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. (corona vaccine registration)

भारताने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरण अभियान केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आले. या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आला.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. (corona vaccine registration)

देशातील कानाकोपऱ्यात आता लस उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र, लसीची चुकीची माहिती देऊन लोकांना मेसेज, ई-मेल आणि सोशल मीडियावर चुकीचे माहिती सांगून काही जण याचा गैरफायदा घेत आहेत, असे पाहायला मिळत आहे.

कोरोना लसीची चुकीची माहिती घेऊन कुणाचे नुकसान होऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण करण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. मात्र, नोंदणी करताना काही चुका टाळाव्यात, असे सांगितले जात आहे.

तुम्हाला मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन नोंदणी करू शकता. मात्र, नोंदणी करताना काही गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवायला हव्यात.

कोरोना लसीकरणासाठी केवळ सर्वसामान्य व्यक्तीसाठी कोविन वेबसाइट आहे. सरकारकडून करोना लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, ती अधिकृत संकेतस्थळावरून करत आहोत ना, याकडे लक्ष ठेवावे.

कोरोना लसीकरणासाठी अधिकृत वेबसाइट http://cowin.gov.in. आहे. गुगल प्ले स्टोरवर कोविन अॅप आहे. पण, हे केवळ अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. आरोग्य सेतू सोडून कोणतेही अॅप डाउनलोड करू नका, असा सल्ला दिला जात आहे. गुगल प्ले स्टोअरवर कोरोना लस मिळेल, असे भासवणारी अनेक अॅप उपलब्ध आहेत. मात्र, फसव्या अॅपपासून सावध राहावे, असे सांगितले जात आहे.

कोरोना लस केवळ अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यावरच मिळणार आहे, ही बाब लक्षात ठेवावी. कोरोना लस संबंधी फोनवर कोणताही मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. अथवा कोणतीही मेसेजची लिंक आली असेल तर ती चुकूनही ओपन करू नका.

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी केवळ ७ कागदपत्रांना मंजुरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणीही अन्य कागदपत्रांची मागणी करीत असेल तर त्याला ती देऊ नका. यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर कार्ड आणि पेंशन कार्ड याचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे 31 मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे.

Read in English