Mobile Battery Life: दर दोन दिवसांनी फोन चार्ज करावा लागतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा अन् बॅटरी लाइफ वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:22 PM2021-06-10T20:22:37+5:302021-06-10T20:26:49+5:30

Mobile Battery Life: बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी नेमके काय करावे? सोपी पद्धत आणि ट्रिक्स जाणून घ्या...

देशभरातील बहुतांश नागरिकांकडे स्मार्टफोन असल्याचे सांगितले जाते. कमी किमतीत अधिक सुविधा ऑफर केल्या जात असल्यामुळे आता स्मार्टफोन घेणे सामान्य नागरिकांनाही तुलनेने सोपे झाले आहे.

स्मार्टफोनमधील सुविधा जेवढ्या जास्त, वापर जेवढा जास्त तेवढी बॅटरीही अधिक प्रमाणात वापरली जाते. काही जण तर दररोज मोबाइलची बॅटरी चार्ज करत असतात.

मोबाइलच्या वापरानुसार फोनची बॅटरी देखील कमी होत जाते. कधीकधी महत्त्वाची कामे करत असताना अचानक फोन डिस्चार्ज होतो. अनेकदा पुन्हा पुन्हा फोन चार्ज करावा लागतो. बॅटरी लाइफ कशी वाढवावी, ते जाणून घेऊया...

प्रथम आपल्याला आपल्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला येथे बॅटरीचा पर्याय दिसेल. हा पर्याय प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या नावाखाली देखील असू शकतो.

या पर्यायावर टॅप केल्यानंतर येथे तुम्हाला बॅटरी सेव्हरचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर, येथे आपल्याला हा पर्याय चालू करण्यास सांगितले जाईल. हा पर्याय आपल्या फोनचा बॅटरी वापर कमी करण्यात मदत करेल.

बर्‍याच वेळा असे होते की फोनमध्ये लोकेशन व जीपीएस ट्रॅकिंग चालू असते. नेहमी त्याची आवश्यकता असतेच असे नाही. अशात, लोकेशन आणि जीपीएस ट्रॅकिंग यापुढे आवश्यक नसतेपर्यंत ते बंद करा. ते सतत सुरू असल्यास फोनची बॅटरी लवकर संपते.

आपण फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर ठेवतो. अशात,आपण एखाद्या फोटोला वॉलपेपर म्हणून ठेवले तर ते अधिक चांगले होईल. तसेच, बॅटरीच्या कमी वापरासाठी फोनमध्ये काळ्या रंगाचा वॉलपेपर ठेवावा.

आपल्यातील बर्‍याच जणांना फोनची ब्राईटनेस खूपच जास्त ठेवण्याची सवय असते. असे केल्याने फोनची बॅटरीही डिस्चार्ज होते. म्हणून फोनची बॅटरी अधिक काळ टिकवून ठेवायची असेल तर फोनची ब्राईटनेस कमी ठेवा.

याशिवाय अनेकदा बॅटरी संपेपर्यंत फोन चार्ज केला जात नाही. याचा परिणाम बॅटरीवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे २० टक्क्यांवर बॅटरी आली की, लगेच फोन चार्ज करावा. तसेच बॅटरी कधीही १०० टक्क्यांपर्यंत चार्ज करू नये, असे सांगितले जाते.

अनेकदा हाती लागेल त्या चार्जरने मोबाइल चार्ज करण्याची अनेकांना सवय असते. असे करणे बॅटरी लाइफवर परिणामकारक ठरू शकते. बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी केवळ ओरिजिनल चार्जरनेच मोबाइल चार्ज करावा असे सांगितले जाते. ओरिजिनल चार्जर हरवला, तर कॉम्पिटिबल चार्जरच वापरावा, असा सल्ला दिला जातो.

मोबाइलचे संरक्षण व्हावे, यासाठी कव्हर वापरले जाते. मात्र, मोबाइल चार्ज करताना ते कव्हर काढून ठेवावे, असे सांगितले जाते. कव्हरमुळे चार्जिंग पीनची कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने झाली की नाही, हे समजत नाही. पिन लूज राहिली, तरी त्याचा परिणाम बॅटरीवर होऊ शकतो, असे सांगितले जाते.

मोबाइल रात्रभर कधीच चार्जिंगला लावून ठेवू नये. असे केल्यास त्याचा बॅटरीवर परिणाम होऊन बॅटरी लाइफ कमी होऊ शकते. तसेच बॅटरी लवकर खराब होण्याचीही शक्यता बळावते, असे सांगितले जाते.

Read in English