3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा 5G Phone उपलब्ध; एकापेक्षा एक स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात
By सिद्धेश जाधव | Updated: December 14, 2021 16:09 IST2021-12-14T16:02:42+5:302021-12-14T16:09:41+5:30
iQOO नं भारतात iQOO Quest Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल अॅमेझॉन इंडियावर आजपासून सुरु झाला आहे. 16 डिसेंबर या सेलचा शेवटचा दिवस असेल. या कालावधीत कंपनीच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळेल.

iQOO Quest Days सेलमध्ये iQOO Z3, iQOO Z5, iQOO 7 आणि iQOO 7 Legend स्मार्टफोन्सवर 3 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट कुपन मिळेल.
एक्सचेंज ऑफर अंतगर्त 3 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. तसेच कंपनी 3 हजार रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा डिस्काउंट देखील देत आहे.
iQOO Z3 5G Phone
24,990 एमआरपी असलेला हा फोन अॅमेझॉन डिस्काउंट कुपनसह या सेलमध्ये 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 6 जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 64MP कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट आणि 55W फ्लॅश चार्जसह बाजारात आला आहे.
iQOO Z5 5G Phone
हा फोन डिस्काउंटनंतर फोन 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट आहे. तसेच यात 64MP कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट 5000mAh ची बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग मिळते.
iQOO 7 5G Phone
34,990 रुपयांमध्ये लाँच झालेल्या हा फोन सेलमध्ये 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. ज्यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट असलेला हा फोन 48MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
iQOO 7 Legend 5G Phone
या फोनवर सेलमध्ये 3 हजार रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला हा फोन 36,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात आला आहे.