1 / 6स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून सर्वच जण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. सोशल मीडियावर अनेक मेसेज, फोटे, व्हिडीओ हे सातत्याने येत असतात. मात्र यातील अनेक गोष्टी या फेक असतात. त्यामुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. पण हे फोटो अथवा मेसेज खरे आहेत की खोटे हे युजर्सना टेस्ट करून जाणून घेणं शक्य असतं. कसं हे जाणून घेऊया.2 / 6ऑल्ट न्यूजची www.altnews.in ही वेबसाईट आणि @AltNews हे टि्वटर अकाउंट आहे. यासोबतच Alt News नावाचं फेसबुक पेज आहे. अल्ट न्यूज खोट्या न्यूजबाबतची सत्यता लोकांसमोर आणते. तुम्हाला कोणत्या मेसेजबाबत सत्य जाणून घ्यायचं असल्यास त्यांना त्यासंदर्भात ट्वीट करा. तसेच contact@altnews.in वर मेल करा. याबाबतची सर्व खरी माहिती युजर्सना मिळेल. 3 / 6एखादी फेक न्यूज ही व्हॉट्सअॅपवर लवकर व्हायरल होते. व्हॉट्सअॅपने याची सत्यता तपासण्यासाठी टिपलाइन सर्व्हिस सुरू केली आहे. 9643000888 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्यानंतर युजर्सना एखादी गोष्ट खरी आह की खोटी याबाबत माहिती मिळेल. 4 / 6फेसबुकने फेक न्यूज रोखण्यासाठी थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम सुरू केला आहे. तसेच Fact Checking Before Sharing Posts या नावाचे एक पेज तयार केले आहे. www.factcheck.org या वेबसाईटवर फॅक्ट चेक करता येईल तसेच Editor@FactCheck.org वर युजर्स प्रश्न विचारू शकतात. 5 / 6सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. एखादी पोस्ट पहिल्यांदा इंटरनेटवर कधी टाकली आहे याबाबत माहिती मिळते. त्यासाठी आर्टकलची लिंक म्हणजेच यूआरएल (यूनीफॉर्म रिसोर्स लोकेशन) अॅड्रेस कॉपी करा. त्यानंतर गुगलच्या होम पेजवर inurl: टाईप करून त्यापुढे ती लिंक पेस्ट करा. ती बातमी सर्वप्रथम कधी पब्लिश झाली याबाबत माहिती मिळेल. 6 / 6फोटो, व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी Google Reverse Image search टूलचा वापर करा. गुगलमध्ये टाईप केल्यावर सर्वात वर https://bit.ly/2MmKDTg पेज ओपेन होईल. त्यावर तो फोटो अपलोड करा. https://reverse.photos आणि Google Image वरून फोटो चेक करू शकता. तसेच व्हिडीओ स्टिल फोटोमध्ये ब्रेक करून अपलोड करून चेक करू शकता.