Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:09 IST
1 / 7आजच्या काळात इन्स्टाग्राम रील्स हे केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, ते कमाईचे आणि प्रसिद्धीचे एक मोठे माध्यम बनले आहे. अनेक जण दिवसाला तासनतास मेहनत करून रील बनवतात, पण त्यांना हवे तसे व्ह्यूज मिळत नाहीत. 2 / 7जर तुमच्यासोबतही असेच घडत असेल, तर कदाचित तुमच्या इन्स्टाग्राम सेटिंगमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे. काही खास सेटिंग्ज आणि ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या रील्सची 'रीच' हजारो-लाखोंपर्यंत नेऊ शकता.3 / 7जर तुमचे अकाउंट अजूनही 'पर्सनल' मोडवर असेल, तर तुमचे रील व्हायरल होण्याची शक्यता खूप कमी असते. सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन तुमचे अकाउंट 'प्रोफेशनल' (Creator किंवा Business) मोडवर स्विच करा. यामुळे तुम्हाला इनसाईट्स मिळतात, ज्यातून तुमचे रील कोणत्या वेळी जास्त पाहिले जातात आणि प्रेक्षकांना काय आवडते, हे समजणे सोपे जाते.4 / 7इन्स्टाग्रामच्या 'Settings' मध्ये 'Privacy' विभागात जाऊन 'Account Suggestion' सेटिंग नेहमी ऑन ठेवा. यामुळे इन्स्टाग्राम तुमचे अकाउंट इतर लोकांशी संबंधित प्रोफाईल्समध्ये सुचवते. यासोबतच, तुमचे प्रोफाईल 'Public' असणे अनिवार्य आहे. प्रायव्हेट अकाउंट असेल तर तुमचे रील केवळ तुमच्या फॉलोअर्सपुरते मर्यादित राहतात आणि 'Explore' फीडमध्ये जात नाहीत.5 / 7रील व्हायरल होण्यासाठी त्यातील गाणे किंवा ऑडिओ खूप महत्त्वाचा असतो. नेहमी 'ट्रेंडिंग' (बाजूला वर जाणारा बाण असलेला ऑडिओ) निवडा. तसेच, तुमचे प्रेक्षक ज्या वेळी सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतात, त्याच वेळी रील पोस्ट करा. रात्री उशिरा किंवा पहाटे रील पोस्ट केल्यास त्याला सुरुवातीचा बूस्ट मिळत नाही.6 / 7लक्षात ठेवा, कोणतीही सेटिंग जादूची काठी नसते. रील व्हायरल होण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी उत्तम असावी. व्हिडिओच्या सुरुवातीचे ३ सेकंद इतके जबरदस्त असावेत की पाहणाऱ्याने तो रील पूर्ण पाहिला पाहिजे. प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी कमेंट्सना उत्तर देणे आणि त्यांच्याशी कनेक्ट राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.7 / 7एखाद्या दिवशी एक रील टाकून कोणीही रातोरात स्टार होत नाही. इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम अशा क्रिएटर्सना जास्त महत्त्व देतो जे सातत्याने कंटेंट पोस्ट करतात. योग्य सेटिंग्ज आणि दर्जेदार कंटेंट यांची जोड मिळाली, की तुमचे रील व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.