शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TV फक्त रिमोटवरून करता बंद? विजेचं बिल वाढवते ‘ही’ छोटीशी चूक; या टिप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:09 PM

1 / 7
देशात करमणुकीचं साधन म्हणून टीव्हीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या करमणुकीसाठी किंमत देखील मोजावी लागते. केबल सोबत विजेच्या बिलावर देखील टीव्हीचा परिणाम होतो.
2 / 7
भारतात जवळपास 70 टक्के लोक टीव्ही मेन स्विचवरून बंद करण्याऐवजी फक्त रिमोटनं बंद करतात. TV स्टँडबाय ठेवल्यामुळे विजेचं बिल वाढतं. चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या तुमचं वीजबिल कमी करण्यास मदत करतील.
3 / 7
काम झाल्यावर तुमच्या घरातील गॅजेट्स योग्य पद्धतीनं बंद करा. गॅजेट्स स्टँडबायवर ठेऊ नका. थेट मेन स्विच बंद करणं केव्हाही चांगलं. स्टँडबाय मोड देखील विजेचा वापर करतो, त्यामुळे वीजबिल वाढतं.
4 / 7
याच सर्वात मोठं उदाहरण टीव्हीच आहे. स्टँडबाय मोडवर ठेवलेला टीव्ही रिमोटवरून येणारे सिग्नल कॅप्चर करता यावे म्हणून पावर वापरत असतो.
5 / 7
टीव्हीच्या स्टँडबाय मोडमधील विजेचा वापर तुमच्या टीव्हीच्या आकार, मॉडेल आणि पावर रेटिंगवर अवलंबुन असतो.
6 / 7
स्टँडबाय मोडमध्ये टीव्ही 10 वॉट पर्यंत विजेचा वापर करू शकतो, असं एक्सपर्ट सांगतात. हा वापर पावर रेटिंगनुसार कमी जास्त होऊ शकतो.
7 / 7
टीव्ही स्टँडबाय मोडवर ठेवण्याऐवजी ती थेट मेन स्विचवरून बंद करावी म्हणजे तुमच्या वीज बिलात फरक दिसून येईल.
टॅग्स :Televisionटेलिव्हिजन