By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:33 IST
1 / 7बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड काढून सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. नकळतपणे तुमच्या नावे असलेले सिम कार्ड जर गुन्हेगारी कृत्यात वापरले गेले, तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. म्हणूनच आपल्या नावावर नेमके किती सिम कार्ड सुरू आहेत हे 'संचार साथी पोर्टल'च्या माध्यमातून तपासणे आता आवश्यक झाले आहे.2 / 7ओळखीच्या व्यक्तीला किंवा मित्राला स्वतःच्या नावे सीम काढून देणे महागात पडू शकते. त्या सीमवरून झालेला कोणताही गैरप्रकार तांत्रिकदृष्ट्या ज्याच्या नावे सीम आहे त्याच्यावर नोंदवला जातो. ज्यामुळे तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.3 / 7आधार कार्ड किंवा पॅन कार्डची झेरॉक्स देताना त्यावर फक्त सीम कार्डसाठी किंवा विशिष्ट कामासाठी असा उल्लेख करून तारीख टाकणे आवश्यक आहे. ओळखीच्या व्यक्ती शिवाय इतरांना कागदपत्रे देणे टाळावे.4 / 7अनोळखी लिंकवर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करू नका. जुने सीम कार्ड बंद करताना टेलिकॉम कंपनीकडे तशी अधिकृत नोंद करा. वेळोवेळी संचार साथी पोर्टलवर लॉग-इन करून स्थिती तपासा.5 / 7केंद्र सरकारच्या संचार साथी (sancharsaathi.gov.in) या पोर्टलवर जाऊन 'TAFCOP' पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा मोबाइल नंबर टाकून ओटीपी मिळवा. यानंतर तुमच्या नावावर असलेले सर्व मोबाइल नंबर तुम्हाला दिसतील. अनोळखी नंबर तुम्ही तिथूनच रिपोर्ट करून बंद करू शकता.6 / 7तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल फोन ब्लॉक करणे. Know Your Wireline Service Provider: तुमच्या क्षेत्रातील इंटरनेट सेवा पुरवठादारांची माहिती घेणे. IMEI Verification: वापरलेला फोन खरेदी करताना तो चोरीचा नाही ना हे तपासणे.7 / 7सायबर गुन्हेगार, खंडणीखोर आणि दहशतवादी कारवायांत गुंतलेले गुन्हेगार स्वतःची ओळख लपविण्यासाठी दुसऱ्याच्या नावावरील सीमकार्डचा वापर करतात. यामुळे पोलिस तपासात निष्पाप नागरिक मुख्य संशयित म्हणून समोर येतात.