शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:08 IST

1 / 7
१. बॅटरी लवकर संपणे: जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप लवकर डिस्चार्ज होत असेल, तर तुमच्या फोनमध्ये एखादे स्पायवेअर ॲप बॅकग्राऊंडमध्ये चालू असू शकते, जो तुमची खासगी माहिती दुसऱ्या सर्व्हरवर पाठवत आहे.
2 / 7
२. फोन वारंवार हँग होणे किंवा ॲप्स क्रॅश होणे: फोन वारंवार 'फ्रीज' होणे किंवा ॲप्स आपोआप बंद पडणे हा देखील मोठा संकेत आहे. एखादे गुप्त सॉफ्टवेअर तुमच्या फोनच्या सिस्टीम रिसोर्सेसवर जास्त भार टाकत आहे, हे यातून सिद्ध होते.
3 / 7
३. डेटाचा असामान्य वापर: तुम्ही कोणताही मोठा डाउनलोड किंवा स्ट्रीमिंग करत नसतानाही इंटरनेट डेटा अचानक खूप वेगाने संपत असेल, तर तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे. एखादे स्पाय ॲप तुमच्या फोनमधून डेटा चोरी करत असण्याची शक्यता आहे.
4 / 7
४. फोन गरम होणे: तुम्ही कोणताही मोठा ॲप किंवा गेम वापरत नसतानाही फोन गरम होत असेल, तर याचा अर्थ बॅकग्राऊंडमध्ये एखादा प्रोग्राम सतत चालू आहे.
5 / 7
कॉल फॉरवर्डिंग तपासा: जर तुम्हाला तुमचा फोन हॅक झाल्याचा संशय असेल, तर तुम्ही तुमच्या कीपॅडवर *#67# हा कोड डायल करा. या कोडमुळे तुम्हाला लगेच कळेल की, तुमचे कॉल, मेसेजेस किंवा डेटा दुसऱ्या कोणत्याही नंबरवर फॉरवर्ड तर केले जात नाहीयेत ना. जर स्क्रीनवर 'फॉरवर्डेड' चा पर्याय दिसला, तर समजून घ्या की तुमचा फोन दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली आहे.
6 / 7
असं असेल तर अजिबात घाबरू नका. फक्त आणखी एक कोड डायल करा – ##002# . हा कोड डायल केल्याने तुमच्या फोनवरील सर्व कॉल फॉरवर्डिंग त्वरित बंद होईल आणि तुमचा डेटा व प्रायव्हसी सुरक्षित होईल.
7 / 7
त्यामुळे, पुढच्या वेळी तुमचा फोन विनाकारण गरम झाला, बॅटरी वेगाने संपली किंवा डेटा अचानक कमी झाला, तर याकडे दुर्लक्ष करू नका. काही सेकंद काढून हे कोड डायल करा आणि तुमची डिजिटल सुरक्षा सुनिश्चित करा.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान