YouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार

By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 02:14 PM2021-01-17T14:14:50+5:302021-01-17T14:20:36+5:30

असे क्वचितच कोणी स्मार्टफोन युझर्स असतील जे YouTube चा वापर करत नसतील. ग्राहकांकडे पाहता सध्या YouTube एका नव्या फीचरची चाचणी करत आहे.

YouTube आणत असलेल्या नव्या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना पाहत असलेल्या व्हिडीओतील वस्तू खरेदी करता येणार आहेत.

सध्या युद्धपातळीवर YouTube कडून हे फीचर आणण्याचं काम सुरू आहे. नव्या फीचर प्रमाणे ग्राहक व्हिडीओत कोणत्याही वस्तू पाहून त्या खरेदी करू शकणार आहेत.

काही ठराविक व्हिडीओंमध्ये हे फीचर उपलब्ध होणार आहे. सध्या YouTube द्वारे या फीचरची अमेरिकेत अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही डिव्हाईस वापरणाऱ्या ग्राहकांद्वारे केली जात आहे.

काही ठराविक क्रिएटर्स या पायलट प्रोजेक्टचा एक भाग आहेत. हे युझर्स आपल्या व्हिडीओमध्ये काही प्रोडक्ट जोडू शकतात, तसंच शॉपिंग बॅग आयकॉनसोबत हे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

YouTube सध्या चाचणी करत असलेल्या या फीचरची माहिती गुगल सपोर्ट पेजवर शेअर करण्यात आली आहे. याद्वारे युझर्स जे प्रोडक्ट पाहत आहेत ते त्यांना या ऑप्शनद्वारे खरेदी करता येणार आहे.

सध्या काही ठराविक क्रिएटर्ससोबतच काम करत असल्याची माहिती YouTube नं दिली. ग्राहकांना शॉपिंग बॅग आयकॉनवर क्लिक करून वस्तूंची यादी पाहता येणार आहे. व्हिडीओच्या खालच्या बाजूला ग्राहकांना हा आयकॉन दिसणार आबे, तसंच या ठिकाणी त्यांना खरेदीही करता येणार आहे.

Bloomberg ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२० मध्ये YouTube ने क्रिएटर्सला व्हिडीओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टला टॅग आणि ट्रॅक करण्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यास सांगितलं आहे. रिपोर्टनुसार हा डेटा Google च्या शॉपिंग टूल आणि अॅनालिटिक्सशी निगडीत असेल.

समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या प्रवक्त्यानंदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ठराविक संख्येतील व्हिडीओ चॅनल्ससोबत सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे, असं यावेळी सांगण्यात आलं.

येत्या काळात सर्व युझर्ससाठी हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Read in English